दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये नाम कमावलं.नवाजच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करणारा नवाजुद्दीन सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व त्याची पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर आलियाने छळ केल्याचा आरोप केला आहे.

नवाजुद्दीनने सात दिवस घरात खोलीत कोंडून ठेवून जेवणही न दिल्याचं आलिया म्हणाली होती. त्यानंतर नवाजवर बलात्काराचा गंभीर आरोप आलियाने केला होता. याबाबत वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं अभिनेत्याच्या पत्नीने सांगितलं होतं. परंतु, वर्सोवा पोलिसांनी नवाजविरोधात तक्रार दाखल करुन घेतलं नसल्याचं आलियाने म्हटलं आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा>> “मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर मुलीने त्याला फोन केलेला , पण…”, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाचा मोठा खुलासा

“नवाजुद्दीन त्याची शक्ती आणि पैशाचा वापर करुन माझ्यापासून मुलांना दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्याविरोधात पोलिसही तक्रार घ्यायला तयार नाहीत. नवाजविरोधात मी सहा तक्रारी केल्या आहेत. पण गंभीर आरोप असूनही वर्सोवा पोलिसांनी त्याच्याविरोधात एकही तक्रार दाखल करुन घेतलेली नाही. आम्ही पती-पत्नी नसून लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं नवाजचं म्हणणं आहे. मग जर आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो, तर नवाजने माझ्या बलात्कार केला आहे. नवाजने माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बंगल्याभोवती ८-१० सुरक्षारक्षक ठेवले आहेत.सगळीकडे कॅमेरे लावले आहेत. त्याने माझ्याचविरोधात तक्रार केली आहे”, असं आलिया म्हणाली आहे.

हेही वाचा>> पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी ट्वीटरवर ट्रेंड, भाऊ शमास फोटो शेअर करत म्हणाला…

पुढे आलियाने “माझ्या बँक अकाऊंटमध्ये शून्य रुपये आहेत. जी व्यक्ती एका चित्रपटासाठी ८-१० कोटी रुपये घेते, त्याच्या पत्नीकडे काहीच पैसे नाहीत. त्याने माझ्या आणि मुलांच्या गरजा कधीच पूर्ण केलेल्या नाहीत. मी आणि नवाजने मिळून घेतलेला फ्लॅट त्याने भाड्याने दिला आहे. त्यामुळे मी तिथेही राहायला जाऊ शकत नाही. पतीच्या घरी राहायला येणं चूक आहे का? दुबईत मुलांना त्याने शिक्षणासाठी पाठवलं. पण दुबईतील घराचं भाडं, विजेचं बील सगळंच रखडलं आहे. मुलांना दुबईत शिक्षणाला पाठवण्याऐवजी त्यांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे”, असं म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मला विनंती करायची आहे. जर माझा हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचला, तर या प्रकरणात कृपया लक्ष घाला. नवाजुद्दीन शक्ती व पैशाचा गैरवापर करत आहे. त्यामुळेच पोलिसही त्याच्याविरोधात तक्रार घेत नाही आहेत. ही एका आईची लढाई आहे, त्यामुळे या प्रकरणात लक्ष घाला”, असं म्हणत आलियाने मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

हेही वाचा>> पाकिस्तानातील प्रसिद्ध टिकटॉकरचा MMS झाला लीक, न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया स्टार म्हणते…

दरम्यान, नवाजुद्दीने पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्याचंही समोर आलं आहे. आलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. नवाजुद्दीनने घराबाहेर काढल्यानंतर बंगल्याच्या गेटवरुनच आलियाने हा व्हिडीओ केला होता. आलिया व तिच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घराबाहेर काढल्यानंतर रडून रडून नवाजुद्दीनच्या मुलीची वाईट अवस्था झाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

Story img Loader