दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याची पत्नी आलियामधील वाद विकोपाला गेला आहे. आलियाने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर छळवणुकीचा आरोप केला होता. याबरोबरच अनेक गंभीर आरोप आलियाने नवाजवर केले होते. या आरोपांवर नवाजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं होतं. आलियाच्या आरोपांवर उत्तर देताना नवाजने काही गोष्टींचा खुलासा केला होता.

“आलिया व मी अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहोत. आलियाला मी दर महिन्याला दहा लाख रुपये देतो. याशिवाय दुबईतील मुलांच्या खर्चासाठीही मी दर महिन्याला पैसे देतो”, असं नवाजने म्हटलं होतं. याबरोबरच माझी प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचंही नवाज म्हणाला होता. नवाजच्या या आरोपांवर आलियाने इन्स्टाग्राम पोस्टमधून उत्तर दिलं होतं. या पोस्टमधून आलियाने नवाज व त्याच्या मॅनेजरवर गंभीर आरोप केले होते. “तू एक बेजबाबदार वडील आहेस. माझ्या नकळत तू आपल्या अल्पवयीन मुलीला तू तुझ्या मॅनेजरबरोबर पाठवलं. माझ्या मुलगी त्या व्यक्तीबरोबर एका हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहिली. या काळात तुझ्या मॅनेजरने माझ्या मुलीला चुकिच्या पद्धतीने स्पर्श केला. ती विरोध करत असतानाही त्याने तिला मिठी मारली. तू किंवा मी आपल्या मुलीबरोबर नसताना तुझ्या मॅनेजरने केलेलं हे कृत्य तू नाकारू शकत नाहीस. तरीही तू त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस”, असं आलियाने म्हटलं होतं. आता पुन्हा आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवाज व तिच्यामधील संवादाचा ऑडिओ शेअर केला आहे.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Image Of PM Narendra Modi.
PM Narendra Modi : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार

हेही वाचा>> “दर महिन्याला १० लाख देतो” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर आलियाचं उत्तर, म्हणाली “त्याने न्यायालयात…”

आलियाने शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ती नवाजबरोबर मुलीच्या प्रकरणाबाबत बोलत आहे. “तू कोणाबरोबरही आपल्या अल्पवयीन मुलीली कसं काय पाठवू शकतोस?”असं आलिया म्हणते. यावर उत्तर देत नवाजुद्दीन “कोणीही नाही…तो माझा मॅनेजर आहे. माझ्यासाठी तो काम करतो”, असं म्हणत आहे. “तरीही तू शोराला घेऊन जायला त्याला परवानगी कशी दिलीस?” असं आलिया विचारते. यावर उत्तर देत नवाजुद्दीन म्हणतो, “मला त्याच्यावर विश्वास आहे”. आलिया पुढे “तुला विश्वास आहे, पण मला नाही”, असं म्हणत आहे. “तुला विश्वास असो नसो…तुझा तर कोणावरच विश्वास नाही. तुला पोलिसांत तक्रार करायची असेल तर कर”, असं नवाजुद्दीन म्हणाल्याचं ऑडीओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीवर आलियाचे पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली “त्याच्या मॅनेजरने माझ्या अल्पवयीन मुलीबरोबर…”

पुढे आलिया “तुझा विश्वास असला तरी मुलीला कोणाबरोबरही नाही पाठवू शकत. उद्या मीही शोराला कोणाबरोबरही दुसऱ्या देशात नाही पाठवू शकत. त्यासाठी तू परवानगी देणं आवश्यक आहे. विश्वास या गोष्टी न्यायालयात नाही सांगू शकत. त्यांना पुरावा लागतो”, असं म्हणते. यावर नवाजुद्दीन “मग कोर्टात जा.ती माझी मुलं आहेत. मी कोणाबरोबरही पाठवेन. तुला पोलिसांत जायचं असेल तर जा”, असं म्हणत आहे. “दुबईत मुलं माझ्याबरोबर माझ्या घरी राहतील”, असं आलिया म्हणते. यावर नवाजुद्दीन म्हणतो, “दुबईतील घराचे पैसे मी देतो. ते माझं घर आहे”.

Story img Loader