नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोघांमधील वाद याआधी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप करत सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले होते. यानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, विभक्त झाल्यानंतर आलियाने नवाजकडून पोटगीत किती रुपये घेतले याची चर्चा सगळीकडे रंगली होती. आता खुद्द आलियानेच याबाबतचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “ती माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते”; नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिल्यावरुन कंगना राणौतवर आलिया भडकली, म्हणाली…

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, मी नवाजुद्दीनकडून एक रुपयाही घेतलेला नाही. उलट मला तुमच्याकडून काहीही नको, असे मी त्यांना लेखी दिले आहे. फक्त हे घर माझ्याकडून घेऊ नकोस अस मी त्यांना सांगितलं आहे. कारण या घरात त्यांचा जीव अडकला आहे. मी नवाजकडून पैसे घेतल्याच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत.”

हेही वाचा- अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर लग्न करणार? डेटिंगच्या चर्चादरम्यान अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली…

आलिया पुढे म्हणाली, “न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवाज दर महिन्याला मला खर्चासाठी पैसे देतात. मी नवाजला पूर्ण घर देत नाही कारण या घरात माझाही अर्धा वाटा आहे. माझ्या वाटणीचा हिस्सा विकून मला कर्ज फेडायचं आहे. जेणेकरुन मी आयुष्यात स्थिर होऊ शकेन”

हेही वाचा- फाटकी जीन्स अन् कुरतडलेली बनियान, बॉबी देओलचा लूक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “तुझ्या पत्नीने…”

नवाजुद्दीन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. दरम्यान, आलिया सध्या दुबईत आहे. मध्यंतरी आलियाचा ‘मिस्ट्री मॅन’बरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर आलिया त्या ‘मिस्ट्री मॅन’च्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui reaction to alimony dpj
First published on: 30-06-2023 at 13:32 IST