बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नवाजुद्दीनने दोन्ही मुलांच्या पालकत्व मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अल्पवयीन मुलांच्या भवितव्यासाठी एकमेकांशी बोलून तोडगा काढण्याचे आदेश शुक्रवारी(२४ फेब्रुवारी) न्यायालयाने नवाजुद्दीन व आलियाला दिले आहेत.

नवाजुद्दीनची पत्नी आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून पुन्हा आलियाने नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत. “नवाजने मुलांच्या कस्टडीसाठी न्यायालयात केस दाखल केली आहे. मुलं कशी मोठी होतात? त्यांना लागणारं डायपर कितीला मिळतं? त्यांना कोणते कपडे लागतात? याबाबत नवाजला काहीच माहीत नाही. आज त्याच्याकडील शक्तीचा, पैशाचा वापर करुन त्याला माझ्याकडून मुलांना घ्यायचं आहे. किती चांगला वडील आहे,हे त्याला सिद्ध करायचं आहे”, असं आलियाने म्हटलं आहे.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म

हेही वाचा>> मुलांच्या कल्याणासाठी एकमेकांशी बोलून तोडगा काढा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या विभक्त पत्नीला उच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचा>> राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारताच प्राजक्ता माळीचं एका शब्दात उत्तर, म्हणाली…

“नवाज त्याच्याजवळील पैसा व त्याच्या शक्तीचा गैरवापर करुन मुलांच्या पालकत्वासाठी भांडत आहे. नवाज, पैशाने तू किती लोकांना खरेदी करणार आहेस? पण पैशाने तू माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करू शकत नाहीस. मी तुला नेहमी माझा नवरा मानलं. पण तू कधीच मला पत्नीसारखी वागणूक दिली नाहीस. तू कधीच मला तुझी पत्नी मानलं नाहीस आणि पत्नीचा दर्जाही दिला नाहीस.तू दिलेल्या जखमा कधीच भरुन निघू शकत नाहीत. आज मी ४० वर्षांची आहे. माझ्या आयुष्यातील तारुण्यातील सगळ्यात किमती वेळ मी तुला दिला. त्यानंतरही तू माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करत आहेस”, असंही आलिया पुढे म्हणत आहे. व्हिडीओमध्ये आलियाला अश्रू अनावर झाल्याचंही दिसत आहे.

हेही वाचा>> ‘साडी के फॉल सा’ गाण्यावर सोनाक्षी सिन्हासह विराट कोहलीने केलेला भन्नाट डान्स, ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

“माझी आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही. नवाजने माझं सगळ्याप्रकारचं नुकसान केलं आहे. नवाज सध्या प्रसिद्धीच्या नशेत आहे. एका आईपासून तो मुलांना दूर करत आहे. माझी मुलं आजही माझ्या कुशीत झोपतात. माझ्यापासून त्यांना दूर करुन ते तुझ्याजवळ आनंदाने राहतील असं तुला वाटतं का? नवाजने फक्त माझ्या मुलीला जवळ घेतलं आहे. माझ्या दुसऱ्या मुलाला वडील म्हणजे काय, हे माहितच नाही. त्याने कधीही त्याला जवळ घेतलेलं नाही. आता मुलं मोठी झाल्यावर नवाजला त्यांची आठवण झाली. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. याबाबतीत नक्कीच ते माझा विचार करतील”, असंही पुढे आलिया म्हणाली आहे.

Story img Loader