बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. मुलांच्या कस्टडीवरुन सुरू असलेल्या त्यांच्यातील वादाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलियाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर असलेल्या मिस्ट्री मॅनची चर्चा रंगली होती. तो मिस्ट्री मॅन कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. या व्हिडीओमुळे तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. आलियाने एक पोस्ट शेअर करत या मिस्ट्री मॅनबद्दल खुलासा केला होता. “आमचं नातं मैत्रीपलिकडे आहे,” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा>> “आधी गरोदर राहायचं आणि मग…”, लग्नाच्या चार महिन्यांतच गुडन्यूज दिलेल्या स्वरा भास्करवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले…

आलियाच्या या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. आलियाचं इन्स्टाग्राम अकाऊंटला ‘आलिया नवाजुद्दीन’ असं नाव आहे. या नावावरुन एका चाहतीने “आधी आडनाव बदल” अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर आलियाने उत्तर दिलं आहे. “लवकरच” असा रिप्लाय आलियाने दिला आहे.

हेही वाचा>> “मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”, TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “बारामतीतील सुपुत्र…”

नवाजुद्दीन आणि आलियामध्ये अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. परंतु, परस्पर संमतीनंतर अभिनेत्याने आलियावरील मानहानीचा खटलाही मागे घेतला असून सध्या दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. आलिया सध्या दुबईत असून, नवाजुद्दीन त्याच्या ‘जोगिरा सारा रा रा रा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui wife aliya reply to fan comment on her post kak