राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नेतृत्व करणारे रोहित पवार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अशी रोहित पवारांची ओळख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित पवारांनी नुकतीच ‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली. वैयक्तिक व राजकीय प्रश्नही रोहित पवारांना या मुलाखतीत विचारण्यात आले. कॉलेज जीवनापासून ते राजकीय कारकिर्दीवरील अनेक प्रश्नांची रोहित पवारांनी उत्तरे दिली.

हेही वाचा>> “दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्ही दोघं पळून…”, तरुणीच्या प्रश्नावर रोहित पवारांनी दिलं उत्तर

रोहित पवारांना या मुलाखतीत “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न करता रोहित पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “मला आलिया भट्ट आवडते.” रोहित पवारांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> रिया चक्रवर्तीचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख? ‘त्या’ ट्वीटवर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचं स्पष्टीकरण, म्हणाली…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी ट्वीटरवर #AskRohitPawar हे सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये एका नेटकऱ्याने रोहित पवारांना “जर तुमचा बायोपिक करायचं ठरलं, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुमची निवड कोण असेल? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर?,” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रोहित पवार यांनी सांगितले, “माझा रोल मलाच करायला आवडेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rohit pawar answer the question which bollywood actress he like said alia bhatt kak