‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीझनमध्ये अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari)ने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये नीलम कोठारीने पहिल्यांदाच ऋषी सेठीयापासून घटस्फोट का घेतला, याबद्दल वक्तव्य केले आहे.

या शोच्या एका एपिसोडमध्ये दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूरबरोबर बोलताना अभिनेत्री नीलम कोठारीने तिच्या मुलीला अहानाला तिच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल इंटरनेटवरून कळाल्याचे सांगत निराशा व्यक्त केली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

काय म्हणाली नीलम कोठारी?

नीलम कोठारीने किस्सा सांगत म्हटले, “मी कामावरून परत आले, त्यावेळी अहाना तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर होती. बहुतेकवेळा ते उड्या मारत असतात, ओरडत असतात, खेळत असतात. पण, त्यावेळी भयाण शांतता होती.”

“अहाना माझ्याकडे आली आणि तिने म्हटले की, मम्मा तू कधीच तुझ्या घटस्फोटाबद्दल सांगितले नाहीस. तिच्या त्या वाक्यावर माझ्याकडे कोणतेच उत्तर नव्हते, माझ्याकडे शब्द नव्हते. मला धक्का बसला होता. मी तिला विचारले, तुला हे कसे समजले? ती म्हणाली की तू सेलिब्रिटी आहेस, त्यामुळे मी आणि माझे मित्र-मैत्रिणी तुझ्याबद्दल गूगल करत होतो. तिथे पहिली गोष्ट ही आली की, तुझा घटस्फोट झाला आहे. तुझं याआधीसुद्धा लग्न झालं होतं”, अशी आठवण सांगत नीलमने म्हटले की, मला असे कधीच वाटत नव्हते अशा पद्धतीने माझ्या पहिल्या लग्नाबद्दल माझ्या मुलीला माहीत व्हावे.”

कोणत्या गोष्टींमुळे घटस्फोट घेतला, याबद्दल बोलताना नीलम कोठारीने म्हटले, “ऋषी सेठियाबरोबर लग्न केल्यानंतर मी दुसऱ्या देशात स्थायिक झाले. मला भारतीय पद्धतीचे कपडे घालण्यास सांगितले. मासांहर करण्यास आणि दारू पिण्यास बंदी घातली. मला माझे नाव बदलण्यास सांगितले, मी तेदेखील केले, अनेक जण असे करतात. मी हे सगळे केले, पण जेव्हा मला माझी ओळखच बदलण्यास सांगितले, तेव्हा ते मी करू शकले नाही. मी हे सगळे कसे करू देत आहे? असा मी स्वत:लाच प्रश्न विचारू लागले. अनेकवेळा जेव्हा मी सुपरमार्केटमध्ये जायचे किंवा जेवणासाठी बाहेर जायचे, तेव्हा कोणीतरी मला येऊन विचारायचे, तुम्ही अभिनेत्री नीलम आहात का? आणि मला ‘नाही, मी नीलम नाही’, असे सांगावे लागत असे.”

हेही वाचा: कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एकता कपूरला हा अनुभव सांगताना नीलम भावूक झाली. घटस्फोटानंतर नीलम अभिनय क्षेत्रात परत आली. ४० चित्रपटांचा भाग असल्याबद्दल अभिमान वाटतो असे सांगत अभिनेत्रीने समीर सोनी आयुष्यात असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

नीलम कोठारीने २००० साली युकेमधील उद्योजक ऋषी सेठियाबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यानंतर लगेच त्यांनी घटस्फोट घेतला. २०११ मध्ये नीलमने समीर सोनीबरोबर लग्न केले असून २०१३ ला त्यांनी अहानाला दत्तक घेतले आहे.

Story img Loader