बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेक वर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. नुकत्याच नीना गुप्ता या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या. नीना यांनी फेमीनिजमविषयी केलेलं वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं, याबरोबरच त्यांनी स्त्री-पुरुष समानता यावरही परखड भाष्य केलं होतं.

आणखी वाचा : ‘नायक २’बद्दल अनिल कपूर यांचं मोठं विधान; इंस्टाग्रामवर चाहत्याला उत्तर देताना केला सीक्वलबद्दल खुलासा

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोवर नीना गुप्ता यांनी हजेरी लावली होती. मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता म्हणाल्या, “मला हे सांगावं असं वाटतंय की सध्याच्या फालतू फेमीनिजमकडे दुर्लक्ष करणं फार गरजेचं आहे, तसंच महिला या पुरुषांच्या समान आहेत याकडे दुर्लक्ष करायला हवं. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यापेक्षा अन् कामाकडे कायम लक्ष देण्यापेक्षा जर तुम्ही गृहिणी असाल तर त्याला कमी लेखू नका, ते सुद्धा फार महत्त्वाचं काम आहे, तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवा, हाच संदेश मला लोकांना द्यायचा आहे.”

आता आपलं हे वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा दावा नीना गुप्ता यांनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधतांना नीना गुप्ता यांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या, “त्यांनी त्या संपूर्ण मुलाखतीमधील तेवढा भाग फक्त काढला अन् त्याचं प्रमोशन केलं ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यात मी म्हणाले होते की माझा या ‘फालतू फेमीनिजम’वर विश्वास नाहीये अन् ते ऐकून लोक आपापसांतच भांडू लागले. लोकांनी मला दोष देण्यापेक्षा माझी मुलाखत पूर्ण पहावी त्यात याचा संदर्भ मिळेल.”

आयुष्यात बऱ्याचदा स्त्रियांना पुरुषांची गरज पडते ही गोष्ट नीना यांनी त्यांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून उत्तमरित्या स्पष्ट करून सांगितली. याबरोबरच इतरही बऱ्याच विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे. नीना गुप्ता नुकत्याच सोनी लीव्हच्या ‘चार्ली चोप्रा’ व नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या सीरिजमध्ये झळकल्या होत्या. दोन्ही चित्रपटात नीना यांच्या कामाची खूप प्रशंसा झाली.

Story img Loader