Masaba Gupta Baby Shower Photos: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) लवकरच आजी होणार आहेत. त्यांची लेक लोकप्रिय अभिनेत्री, फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता गरोदर आहे. रविवारी मसाबाचे डोहाळे जेवण पार पडले. या कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधील बॉलीवूडमधील काही अभिनेत्री दिसत आहेत.

मसाबा गुप्ता लवकरच पती सत्यदीप मिश्राबरोबर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तिने एक पोस्ट करून ती गरोदर असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून अनेकदा ती गरोदरपणाशी संबंधित पोस्ट शेअर करते. मसाबा सोशल मीडियावर सक्रिय आहे, नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला, यात सोनम कपूर, रिया कपूरसह तिच्या अनेक मैत्रिणींची झलक पाहायला मिळाली.

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

मसाबाच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो व्हायरल होत आहेत, यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सी ग्लो पाहायला मिळतोय. मसाबाने या खास दिवसासाठी बेज रंगाचा, फूल स्लिव्ह्ज फिट व फ्लेअर ड्रेस निवडला. तिने हिऱ्यांचे दागिने घालून तिचा हा लूक पूर्ण केला.

मसाबाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. सोनम कपूरने (Sonam Kapoor) मसाबासाठी हा कार्यक्रम होस्ट केला. मसाबाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या आहेत, ज्यात ती हातात माइक घेऊन बोलताना दिसतेय. तिचे हे फोटो ‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

मसाबाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो

मसाबा गुप्ताच्या बेबी शॉवरची थीम बेज रंगाची होती. याच रंगाचे बिस्किट व इतर वस्तूदेखील होत्या. तिच्या ज्या मैत्रिणींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यांनीही बेज रंगाचे कपडे घातले होते. सोनम कपूरने दिवसासाठी तपकिरी रंगाची साडी निवडली, तर तिची बहीण रिया हिने बेज टोनचा मॅक्सी ड्रेस घातला होता. भूमी पेडणेकरची बहीण समीक्षाने बेज रंगाचा बॉडी कॉन ड्रेस घातला होता.

“त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

मसाबाची आई नीना गुप्ता यांनीदेखील बेज रंगाचा मिडी ड्रेस घातला होता. सोनी राजदान, शाहीन भट्ट, आकांशा रंजन आणि बरेच कलाकार मसाबाच्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते.

masaba gupta baby shower
मसाबा गुप्ताच्या बेबी शॉवरचे फोटो (फोटो – सोशल मीडिया)

मसाबा गुप्ताबद्दल बोलायचं झाल्यास ती नीना गुप्ता व वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने पहिलं लग्न मधू मंटेनाशी केलं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २७ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली.

Story img Loader