अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड्स यांचे अफेअर सर्वश्रुत आहे. त्यांच्या या नात्यामधून त्यांना एक मुलगी झाली. नीना यांनी या मुलीचे नाव मसाबा असे ठेवले. तेव्हा व्हिव रिचर्ड्स यांचा विवाह झाला होता. त्यांच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे नीना यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली होती. मुलीच्या जन्मानंतर व्हिव यांनी सर्व जबाबदाऱ्या झटकल्या. यामुळे नीना यांनी एकट्याने त्यांच्या मुलीचा सांभाळ करायचा निर्णय घेतला. त्यांची मुलगी मसाबा फॅशन डिझायनर आहे. तिने नेटफ्लिक्सच्या ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये अभिनयदेखील केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या शुक्रवारी सूरज बरजात्या दिग्दर्शित ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त नीना गुप्ता यांनी चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. त्या सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये त्यांनी भूतकाळामध्ये घडलेल्या काही घटनांवर आपली बाजू मांडली आहे.

आणखी वाचा – “ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, “ज्या माणसाच्या मुलीचा मी जन्म दिला, तो माझ्याबरोबर राहणार नाही हे ठाऊक असूनही मी त्याच्या प्रेमात पडले. ही गोष्ट मी ठरवून केली नव्हती. देवाने माझ्यासमोर ठेवलेल्या परिस्थितीचा मी स्वीकार करत गेले.”

आणखी वाचा – “हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

त्या पुढे म्हणाल्या, “मी घेतलेल्या निर्णयाबद्दल ठाम रहायचे ठरवलं, माघार घेतली नाही. कधीही कोणाची आर्थिक किंवा भावनिक मदत घेतली नाही. या प्रवासामध्ये मी खूप काही भोगलं, सहन केलं आणि मजासुद्धा केली. तेव्हा मी काय करणार होते? या व्यतिरिक्त भूतकाळातल्या घटनेवर रडत बसणं किंवा मला ‘हे मूल हवं आहे’ असं म्हणत दुसऱ्या एका माणसाशी लग्न करणं असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी रडून माझं उर्वरित आयुष्य रडण्यामध्ये वाया घालवू शकले असते. मी जे केलं त्यामधून मला कोणालाही मी किती शूर आणि धाडसी आहे हे दाखवायचं नव्हतं. देवाने मला जे काही दिलं, त्याचा स्वीकार करत मी पुढे गेले.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta has commented on raising a girl child alone yps