ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्या अनेक विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. त्यांनी काही काळापूर्वी कास्टिंग काउचबद्दल विधान केलं होतं. ते विधान आता पुन्हा चर्चेत आहे. कोणत्याही नवोदित अभिनेत्रीला चित्रपटातील भूमिकेसाठी कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती केली जात नाही. त्यांना किती तडजोड करायची आहे हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीत येणाऱ्या नवोदित अभिनेत्रींना दोन वर्षांपूर्वी नीना यांनी सल्ला दिला होता. “इथे तुम्हाला कोणीही कुणासोबत झोपायला भाग पाडत नाही, जबरदस्ती करत नाही. तुम्ही किती तडजोड करायला तयार आहात हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे खूप सोपं आहे. जर तुम्ही ‘नाही’ म्हणाल तर आणखी १० मुली ‘हो’ म्हणायला तयार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत (काम देणारे) झोपा आणि ते तुम्हाला भूमिका देतील असं नाही. ते तुम्हाला गर्दीत कुठेतरी छोटी भूमिकाही देऊ शकतात. हा व्यवसाय आहे आणि इथे किती तडजोड करायची हे तुमच्या हातात आहे,” असं नीना यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या ‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्या भूमिका आहेत.