भिनेत्री नीना गुप्ता यांनी तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुल्क’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘बधाई हो ‘ या चित्रपटांद्वारे त्यांनी पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या काळात अनेक शैलीचे (Genre) चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात अशा वेळी अनेक जण ‘अ‍ॅनिमल’ सारख्या चित्रपटाला पण पसंती देतात आणि ‘लापता लेडीज’सारख्या चित्रपटालादेखील तितकंच उचलून धरतात. यामागे नक्की काय गणित आहे. याबद्दल नीना गुप्ता बोलल्या आहेत.

आता नीना गुप्ता ‘पंचायत’ या टीव्ही सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या तयारीत आहेत, आणि लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने नीना यांनी फर्स्टपोस्टला हजेरी लावली.

हेही वाचा… “आम्हाला नावं ठेवता ना मग…”, नम्रता संभेरावने शेअर केला प्रसाद खांडेकरचा मजेशीर व्हिडीओ, म्हणाली…

‘फर्स्टपोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मुलाखतदाराने नीना गुप्ता यांना विचारलं की, आजच्या काळात एकीकडे ‘जवान’ आणि ‘अ‍ॅनिमल’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिरवर उत्कृष्ट कामगिरी करतात, पण ‘लापता लेडीज’ आणि ‘आर्टिकल ३७०’ सारखे चित्रपटही चांगले चालताना दिसतात. ज्या प्रकारे कॉन्टेन्ट विकसित झाला आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहे?

या प्रश्नाचं उत्तर देत नीना गुप्ता म्हणाल्या, “मी तुम्हाला एक उदाहरण देईन, कारण मनोरंजनसृष्टीत कॉन्टेन्ट खूप आहे. पुस्तकांची दुकाने बंद झाली आहेत का? नाही, बरोबर? प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येकाची स्वतःची जागा असते. काही लोकांना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट आवडतो, काहींना ‘लापता लेडीज’ आवडतो, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा आशय हवा असतो कारण लोक सारखे नसतात, सगळ्यांची आवड निवड सारखी नसते.”

हेही वाचा… ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेला मिळाला ‘हा’ पुरस्कार, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

नीना गुप्ता यांनी या मुलाखतीदरम्यान अनेक विषयांवर भाष्य केलं. टेलिव्हिजन, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं असल्याने नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातला अनुभवदेखील सांगितला.

हेही वाचा… तब्बल २७ वर्षानंतर काजोल करणार ‘या’ सुपरस्टारबरोबर काम; चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरूवात

दरम्यान, नीना गुप्ता यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, वी. के. प्रकाश दिग्दर्शित ‘कागझ-२’ या चित्रपटात नीना गुप्ता शेवटच्या झळकल्या होत्या. लवकरच त्यांच्या ‘पंचायत’ या टीव्ही सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिपक कुमार मिश्रा यांची ही टीव्ही सीरिज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta opinion on laapataa ladies and animal movies content dvr