नीना गुप्ता या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात. नीना यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नीना जितक्या त्यांच्या रील लाईफमुळे चर्चेत असतात तितक्यात त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. त्यांचा लूक आणि बोल्ड स्टाइलमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.

हेही वाचा- Video: ब्रेकअपनंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच भेटल्यावर रवीना टंडनने अक्षय कुमारचं केलं कौतुक; म्हणाली, “तू कायम…”

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणबद्दल भाष्य केलं आहे. मेट गाला किंवा ऑस्करच्या रेड कार्पेटवर या अभिनेत्रींना पाहिल्यावर त्यांचा खूप हेवा वाटतो, असं नीना गुप्ता म्हणाल्या. गुप्ता यांनी हेवा वाटण्यामागचे कारणही सांगितले आहे.

हेही वाचा- मुहुर्त ठरला! सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची तारीख पक्की; ‘या’ दिवशी प्रेयसी द्रिशाशी घेणार सात फेरे

नीना गुप्ता यांनी नुकतेच न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा जेव्हा मी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांना जागतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना पाहते तेव्हा मला वाटते की मी देखील एक तरुण अभिनेत्री असते तर. माझी इच्छा आहे की आम्हालाही असेच एक्सपोजर मिळाले पाहिजे. मी प्रत्येक क्षणाला त्याबद्दल विचार करते. मला प्रत्येक सेकंदाला जाणवते. मला आश्चर्य वाटते की जर मी ही तरुण अभिनेत्री असते तर काय झाले असते. मला माहित आहे की तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे सर्वकाही मिळत नाही. मात्र, या वयातही जे काही काम माझ्या वाट्याला येत आहे, त्याबद्दल मी निश्चितच आभारी आहे. पण हो, जेव्हा मी त्यांना गाऊन घालून ग्लोबल प्लॅटफॉर्मवर फिरताना पाहते तेव्हा मला खूप हेवा वाटतो.”

हेही वाचा- “सत्य हे आहे की…,” शबाना आझमींनी ‘द केरला स्टोरी’बद्दल केलेल्या वक्तव्यावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

नीना गुप्ता २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या दिसल्या होत्या. तसेच त्या नुकतीच राणी मुखर्जीच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातही काम केलं होतं. ‘चार्ली चोप्रा’ आणि द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅलीमध्ये दिसणार आहे. सध्या त्या ‘मेट्रो इन डिनो’चे शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Story img Loader