बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विवियन रिचर्ड्सशी अफेअर असो किंवा दुसरे लग्न असो, नीना यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर कायम चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये काम करत असताना चित्रीकरणादरम्यान आलेल्या विचित्र अनुभवाबद्दल त्यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’ या त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहलं आहे की, “मला अनेकदा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या मुली आणि अभिनेत्री शूटिंगच्या वेळी त्यांच्या खोलीत एकटे राहायला का घाबरतात? तुम्ही नेहमी कुणालातरी सोबत का ठेवता? पण त्या दिवशी माझ्याबरोबर जे घडले तेव्हा मला समजले की एकत्र राहणं किती आवश्यक आहे. जयपूरच्या सामोदे पॅलेसमध्ये ‘बटवारा’चे शूटिंग सुरू होते. शुटिंग संपल्यानंतर सर्वांना कुलभूषण खरबंदा यांच्या खोलीत ड्रिंकसाठी बोलावण्यात आले. तिथे सर्व अभिनेते-अभिनेत्री बसले होते. कुलभूषणजींनी त्यांच्याच खोलीतून रूम सर्व्हिसची ऑर्डर दिली. मी पीत नसल्यामुळे मी जेवणाची वाट पाहत होते. यादरम्यान माझी नजर तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर पडली, चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा तो पती होता.”

अमिताभ बच्चन यांच्या मेसेजने उडाली विकी कौशलची झोप; ‘केबीसी’ कार्यक्रमात अभिनेत्याने केला खुलासा

नीना गुप्तांनी पुढे लिहले आहे की “मला बाहेर येण्यासाठी त्या व्यक्तीने इशारा केला, मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हते त्यामुळे मी दुर्लक्ष केले. पण तो पुन्हा इशारा करू लागला. मला तिथे थांबणे योग्य वाटले नाही. म्हणून मी बाहेर पडून थेट माझ्या खोलीत गेले आणि विचार करू लागले इतक्यात माझ्या दरवाजावर थाप पडली. मी हळूच पीप होलमधून पहिले तर तीच व्यक्ती होती. मी घाबरून गेले. मी पुन्हा माझ्या बेडवर येऊन बसले थोड्यावेळाने माझ्या खोलीतला फोन वाजला, मला वाटलं उद्याच्या शूटिंगसाठीचा फोन असेल पण फोनवर ती व्यक्ती होती. तिने मला विचारले “काय करतेस?” त्यावर मी उत्तर दिले “मी दमले आहे आता झोपेन” यावर ती व्यक्ती म्हणाली “ठीक आहे नंतर बघू,” हा सगळं प्रकार अत्यंत धक्कादायक होता तेव्हा मला कळलं की अभिनेत्री हॉटेलमध्ये एकट्या का राहत नाहीत.” हा किस्सा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहला आहे.

नीना गुप्ता अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. ‘वध’च्या आधी त्या अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’बरोबरच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटातही झळकल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta shared horrible expirence actress husband follow her in hotel room spg