बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचबद्दल अनेकदा बोललं जातं. अनेक अभिनेत्रींनी यावर उघडपणे भाष्य केलं आहे. कास्चिंग काऊच म्हणजे चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अभिनेत्रींकडे शरीरसंबंधांची मागणी करणं. अभिनेत्री नीना गुप्ता यांनाही त्यांच्या आयुष्यातही या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता. सध्या नीना गुप्ता त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच त्या ‘उंचाई’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र या संपूर्ण प्रवासात त्यांनाही कास्टिंग काऊचचा अनेकदा सामना कारावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीना गुप्ता यांनी त्यांची आत्मचिरित्र ‘सच कहूं तो’मध्ये कास्टिंग काऊचच्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं, “हो कास्टिंग काऊच होतं. अनेकदा तुमच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली जाते. पण हे सर्व तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. तुम्हाला हे करायचं आहे की नाही यावर सगळं अवलंबून असतं. माझ्या अनुभवांवरून मी सांगू शकते की जर तुम्ही असं काही केलं तरी याची काहीच खात्री नाही की त्यानंतर तुम्हाला चांगली भूमिका मिळेल. कारण हा एक बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये जे विकलं जातं तेच तुम्हाला घ्यावं लागतं.”

आणखी वाचा- …अन् रागाच्या भरात सनी देओलने फाडली होती स्वतःची पँट, वाचा नेमकं काय घडलं?

नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कास्टिंग काऊचवर भाष्य करताना दोन किस्से सांगितले आहेत. त्यांनी हे सांगितना प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. नीना गुप्ता यांचा ‘खानदान’ चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर त्यांना सातत्याने नकारात्मक भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. नीना चांगल्या भूमिकाच्या शोधात असताना त्यांची भेट एका दाक्षिणात्य निर्मात्याशी झाली होती. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना या निर्मात्याचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी नीना नाटकात काम करत होत्या. नाटकाचा शो संपल्यानंतर नीना त्या निर्मात्याला भेटण्यासाठी हॉटेलवर गेल्या तेव्हा त्यांने नीना यांना त्याच्या रुममध्ये बोलावलं.

नीना यांनी याबद्दल त्यांच्या पुस्तकात लिहिलं, “एकदा माझ्या मनात आलं जावं की नाही किंवा मग त्यांना खाली बोलवावं का? पण नंतर त्यांना वाईट वाटलं तर असा विचार करून मी लिफ्टने वर त्यांच्या रुममध्ये गेले. मी डोअर बेल वाजवली. तो एक सिंगल रुम होता. ज्यात एक बेड आणि एक खुर्ची होती. ते खुर्चीवर बसले होते आणि मी बेडच्या एका टोकाला बसलेले. आम्ही चित्रपटासंबंधी बोललो. मी त्यांना माझ्या भूमिकेबाबत विचारल्यावर ते म्हणाले की तुला नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारायची आहे. ही एक छोटी भूमिका होती. काही वेळ मी शांत बसले आणि त्यांना म्हणाले, सर मला जायचं आहे. यावर ते म्हणाले, कुठे जाणार आहे. तू तर इथे पूर्ण रात्र माझ्याबरोबर थांबणार होतीस. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मला ते असं का बोलत आहेत हे समजत नव्हतं. मी त्यांना भेटायला आले याचा अर्थ त्यांनी त्यांच्यासह संपूर्ण रात्र घालवेन असा का घ्यावा हे कळत नव्हतं.”

आणखी वाचा-“मी त्याचा तिरस्कार…” एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्सबद्दल नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

नीना गुप्ता यांनी कास्टिंग काऊचसंबंधी दुसऱ्या भागात सुपरस्टार अभिनेते देव आनंद यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं, “अनेक वर्षांनंतर देव आनंद सरांनी मला त्यांच्या एका चित्रपटातील भूमिकेसंबंधी बोलण्यासाठी हॉटेलवर भेटायला बोलावलं होतं. मजेदार गोष्ट म्हणजे त्यावेळी देव आनंद सरही त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला समजलं की देव आनंद सरांचा एक स्यूट संपूर्ण वर्षभरासाठी तिथे बुक केलेला असतो. अशात मी हॉटेलवर पोहोचले तेव्हा मागच्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. मी स्वतःला म्हटलं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही मी जाणार आणि त्यांना भेटणार आहे.”

आणखी वाचा- “आताच्या अभिनेत्यांना तरुण अभिनेत्री हव्या आणि…” नीना गुप्ता असं का म्हणाल्या?

नीना यांनी पुढे लिहिलं, “मी वरच्या मजल्यावर गेले आणि डोअर बेल वाजवली. देव सरांनी दरवाजा उघडला आणि माझं स्वागत केलं अगदी ते त्यांच्या चित्रपटात करतात तसं. मला चहा कॉफी विचारली. खूप आदराने माझ्याशी बोलले आणि भूमिकेबद्दल सांगितलं. ती खूपच छोटी भूमिका होती. मी त्यांना म्हटलं सर तुमच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे. पण मला यापेक्षा चांगल्या भूमिकेची अपेक्षा आहे. यावर त्यांनी ठीक आहे काही समस्या नाही असं उत्तर दिलं. मी त्यांना त्यांना विचारलं तुम्ही नाराज तर नाही ना. त्यावर ते म्हणाले, अरे नाराज का व्हावं. तुला ही भूमिका करायची की नाही हा तुझा निर्णय आहे. त्यानंतर काही वेळ गप्पा मारून मी त्यांचा निरोप घेतला.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta talk about casting couch share experience of working with dev anand mrj