ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हेदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सलमान खानशी ऑन-स्क्रीन रोमान्स करण्याची इच्छा बोलून दाखवली.

हेही वाचा – ‘अल्लाह के बंदे’ गात प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास; कैलाश खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
ram gopal verma pushpa 2 review
राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

अलीकडेच नीना गुप्ता ‘गुडबाय’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 16’ च्या सेटवर पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी सलमान खानबरोबर काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांनी सलमान खानसोबत खूप धमाल केली होती. दरम्यान, नवभारत टाइम्सशी बोलताना नीना गुप्ता यांना सलमानबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा नीना गुप्ता यांनी एक जुना किस्सा सांगितला.  

“त्यांनी मला हॉटेलमध्ये बोलवलं अन्…” कास्टिंग काऊचबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी केला देव आनंद यांचा उल्लेख

त्या म्हणाल्या, “मागच्या वेळी मी अनिल शर्माचा चित्रपट केला होता, त्यात सलमानच्या आईची खूप छोटी भूमिका साकारली होती. पण मला त्याच्यासह आणखी जास्त काम करायचंय. मला सलमान आवडतो आणि एक व्यक्ती म्हणून मी त्याला पसंत करते. त्याच्याबद्दल मी जे पाहते, ऐकते ते चांगलं असतं. तो स्वतःचा उदोउदो करत नाही, तो खूप मदत करतो. मला त्याच्याबद्दल या गोष्टी माहीत असण्याचं कारण म्हणजे आम्ही काही वर्षांपूर्वी सांताक्रूझच्या गल्लीत मसाबासाठी ऑफिस भाड्याने घेतेले होते. त्या इमारतीत प्रवेश करताच डाव्या बाजूला लोकांची गर्दी होत होती. तिथे कुणीतरी डॉक्टर यायचे. नंतर मला कळलं की ते सलमान खान करायला लावायचा. तिथे येणाऱ्यांकडून पैसे न घेता मोफत उपचार केले जायचे. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नसतानाही एक माणूस म्हणून मला तो आवडतो.”

…अन् पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडने अभिनेत्रीला केले प्रपोज; फोटो पाहिलेत का?

सलमानबरोबर काम करताना कशी भूमिका साकारायला आवडेल, असं विचारल्यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “मला सलमानबरोबर एक रोमँटिक चित्रपट करायचा आहे, त्याच्या आईची भूमिका करायची नाही. जेव्हा एखादा ६० वर्षांचा पुरुष २० वर्षांच्या मुलीशी लग्न करू शकतो, तेव्हा माझी आणि सलमानची मैत्री नक्कीच होऊ शकते. आमच्या वयात खूप जास्त फरक नाही.”

Story img Loader