बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने ६ नोव्हेंबर (रविवारी) एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया-रणबीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने कपूर कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसुतीनंतर आलिया आणि तिच्या बाळाबाबतच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. नीतू कपूर यांनी सून आणि नातीची तब्येत कशी आहे, याचा खुलासा केला आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर कुटुंबियांसह नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रसुतीनंतर त्यांनी पापीराझींशी साधलेल्या संवादात आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली. आलिया आणि नात आता कशी आहे, असा प्रश्न पापीराझींकडून नीतू कपूर यांना विचारण्यात आला.

हेही वाचा >> Video : झी मराठीच्या मालिकेमध्ये सिद्धार्थ जाधवच्या ‘त्या’ डायलॉगचा वापर, कुशल बद्रिकेनेच लक्षात आणून दिलं अन्…

“आलिया आणि तिचं बाळ एकदम छान आहे. दोघींची प्रकृती चांगली आहे”, असं नीतू कपूर म्हणाला. पापीराझींनी “नीतू कपूर यांना नात कोणासारखी दिसते?”, असा प्रश्नही विचारला. यावर नीतू कपूर म्हणाल्या “अजून बाळ लहान आहे. त्यामुळे ती रणबीरसारखी दिसते की आलियासारखी हे सांगणं कठीण आहे”. नातीच्या जन्मानंतर नीतू कपूर फारच आनंदी असल्याचं दिसून आलं. पापीराझींशी संवाद साधतानाच्या व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >> राखी सावंत शर्लिन चोप्राला म्हणाली चेटकीण अन्…; साजिद खानवरुन सुरू झालेल्या वादात दोघींची कॅट फाईट

हेही वाचा >> ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

आलिया-रणबीर आईबाबा झाल्यामुळे त्यांचे चाहतेही आनंदात आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neetu kapoor gives an health update about alia bhatt and baby girl after delivery kak