नीतू कपूर ही बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना होते. नीतू कपूर यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त नितू कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. ती तिच्या कुटुंबाबद्दल आणि चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत असतात. अलीकडेच नितू कपूरने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
हेही वाचा- फहाद अहमदने स्वराला ‘भाऊ’ म्हणत शुभेच्छा दिल्याने संतापले नेटकरी; म्हणाले, “आपल्या बायकोला…”
नीतू कपूर यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी तुम्हाला सात वर्षांपासून डेट केले. याचा अर्थ तो तुमच्याशी लग्न करेल असे नाही. माझ्या काकांनी सहा वर्षे वैद्यकशास्त्र शिकले, पण आता ते डीजे आहे. नीतू कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकरी नितू कपूरच्या या पोस्टला रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादूकोण आणि कतरिना कैफसोबत जोडत आहेत.
नितूच्या पोस्टवर नेटकऱ्यांची कमेंट
नितू कपूरच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘नीतू कपूर नेहमीच कतरिना कैफच्या विरोधात राहिल्या आहेत. त्यांच्या ब्रेकअपच्या वर्षांनंतरही त्या तिला टोमणे मारत आहे. दोघेही सात वर्षे एकत्र होते. रौनक नावाच्या युजरने लिहिले की, ‘इतक्या वर्षानंतरही नीतू कपूर कतरिनावर कमेंट करत आहेत, तर कतरिना तिच्या कामाशी संबंधित आहे. हे कुटुंब खूप विचित्र आहे.’ एका यूजरने म्हटले की, ‘कदाचित ही पोस्ट रणबीर कपूरसाठी असेल.’ हिमांशू नावाच्या युजरने लिहिले की, ‘जोपर्यंत नीतू कपूरसारख्या महिला आहेत, तोपर्यंत रणबीर कपूरसारख्या पुरुषांना उचलून धरले जाईल आणि त्यांचे कौतुक केले जाईल.
नीतू कपूर यांना कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण कधीच आवडत नसल्याचं सांगण्यात येतं. आपल्या मुलाने या दोघांपैकी कोणाशीही लग्न करावे असे त्यांना वाटत नव्हते. दीपिका आणि कतरिनाला नीतू कपूरसारखी सासू मिळाली नाही हे चांगलं असल्याचंही यूजर्स म्हणतात. एक काळ असा होता की रणबीर कपूरचे नाव नवनवीन अभिनेत्रींसोबत जोडले जायचे.
रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतरही चर्चा
अभिनेत्री कतरिना कैफ आणि तरुणाईचा लाडका अभिनेता रणबीर कपूर यांचं नातं हा बॉलिवूडमधील चर्चेचा विषय होता. ते जवळपास सहा वर्ष एकत्र होते. दोघेही लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांच्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर रणबीरने आलिया भट आणि कटरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलियाला राहा नावाची मुलगी आहे.