बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर नेहमी चर्चेत असतात. मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नीतू कपूर यांनी स्वत:ला एक खास भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर यांची सून आलिया भट्टने स्वत:साठी मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान घर घरेदी केलं होतं. आता नीतू कपूर यांनीही सुनेच्या पावलावर पाऊल टाकत स्वत:साठी नवीन फ्लॅट खरेदी केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नीतू कपूर यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक आलिशान ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. नीतू यांनी १.०४ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती आहे. १० मे २०२३ रोजी त्यांनी फ्लॅटची नोंदणी केली होती. ३,३८७ चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या आलिशान अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग एरियादेखील आहेत. नीतू कपूर यांच्या नवीन फ्लॅटची किंमत तब्बल १७.४ कोटी रुपये आहे.

Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Allu Arjun children whisked away after attack on home
Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
sanjay raut house recce
संजय राऊत रेकीवर मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान…म्हणाले मच्छर…
mp Sanjay raut house recce
संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

यापूर्वी, मार्च २०२३ मध्ये नीतू कपूर यांनी नवीन ‘मर्सिडीज मेबॅक जीएलएस ६००’ खरेदी केली होती. या कारच्या बाहेरील भागाप्रमाणेच आतील भागही लक्झरी आहे. कारच्या इंटिरिअरमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेन्शनसह सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेऱ्याचा समावेश आहे. उत्तम फीचर्स आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या नीतू कपूरच्या कारची एक्स-शोरूम किंमत २.९२ कोटी रुपये आहे.

हेही वाचा- लग्नाबद्दल सारा अली खानने दिलेला ‘तो’ सल्ला चर्चेत, म्हणाली “विकी कौशल माझा चौथा सहकलाकार ज्याने…”

काही दिवसांपूर्वी आलियाने स्वत:साठी मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान घर घरेदी केलं होतं. २,४९७ स्केअर फुटांचं घर आलियाने खरेदी केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलियाची प्रॉडक्शन कंपनी ‘इंटरनॅशनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’कडून हे घर खरेदी करण्यात आलं आहे. या घराची किंमत ३७.८० कोटी इतकी आहे. तर घर खरेदी करण्यासाठी आलियाने २.२६ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरल्याची माहिती आहे.

Story img Loader