अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. बॉलिवूडच्या या बहुचर्चित जोडीने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केल्यानंतर सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आलिया भट्टच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाच्या सासूबाई नीतू कपूरही नातीच्या जन्मानंतर खूप खूश असल्याचं दिसतंय. नुकताच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आलियाला भेटून रुग्णालयातून घरी परतलेल्या नीतू कपूर यांना काही फोटोग्राफार्सनी घेरलेलं दिसत आहे. ते नीतू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आलियाच्या तब्येतीची आणि त्यांच्या नातीचीही चौकशी करताना दिसत आहेत. याचवेळी एक फोटोग्राफर, आलियाची मुलगी म्हणजे नीतू कपूर यांची नात नेमकी कोणासारखी दिसते? आलिया की रणबीर? असा प्रश्न विचारताना दिसतो.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

आणखी वाचा-“मुली खरंच खूप…” आई झालेल्या आलियासाठी दाक्षिणात्य स्टार महेश बाबूची खास पोस्ट

नीतू कपूर यांनी फोटोग्राफरशी बोलताना नीतू कपूर यांनी आलिया आणि बाळाची तब्येत एकदम उत्तम असल्याचं सांगितलं तसेच मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला. मात्र जेव्हा मुलगी कोणासारखी दिसते असं विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, “अजून तर बाळ लहान आहे. त्यामुळे आत्ताच काही सांगता येणार नाही.” नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा-“७ महिन्यांतच मुलगी…” आलिया भट्ट आई झाल्यानंतर अभिनेत्यानं केलेलं ट्वीट चर्चेत

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘जी ले जरा’मुळेही चर्चेत आहे. तसेच आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Story img Loader