अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. रणबीर व आलियाप्रमाणेच त्यांची मुलगी राहा चर्चेत असते. गेल्यावर्षी नाताळचे औचित्य साधून दोघांनी पहिल्यांदाच मीडियाला राहाचा चेहरा दाखवला होता. सोशल मीडियावर राहाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर राहावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आता राहाचा आणखी एक नवा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहाचा पहिला फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा अनेकांनी तिची तुलना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर केली. काहींच्या मते ती हुबेहूब तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते. अनेकांनी ऋषी कपूर व राहाचा फोटो पोस्ट करत दोघांच्या चेहऱ्यातील साम्यही दाखवले होते. आता ऋषी कपूर व राहाचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- ‘मिस्टर इंडिया’दरम्यान अनिल व बोनी कपूर होते चिंताग्रस्त; शेखर कपूर म्हणाले, “त्यांच्या कुटुंबाचा पैसा…”

व्हायरल फोटोमध्ये ऋषी कपूर यांनी राहाला कडेवर घेतलेले दिसून येत आहे. एवढंच नाही तर ते तिच्याकडे प्रेमाने बघतानाही दिसत आहेत. पण, हा फोटो खरा नसून एका चाहत्याने एडिट केला असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

एवढेच नाही तर नीतू कपूर यांनीही तो फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअरही केला आहे. राहा व ऋषी कपूर यांचा फोटो बघून नीतू कपूर भावुक झाल्या. हा फोटो एडिट करणाऱ्या एडिटरचे त्यांनी कौतुकही केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “ही एवढी चांगली एडिटिंग आहे की, आम्हाला ते पाहून खूपच आनंद झाला… खूप खूप धन्यवाद…”

हेही वाचा- ‘इंडियन पोलीस फोर्स’ मधील ‘झरार’ने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलात का?

एप्रिल २०२२ मध्ये आलिया व रणबीरने लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणबीर व आलियाने तिचे नाव राहा असे ठेवले. लेकीच्या जन्मानंतर रणबीर व आलियाने वर्षभर तिचा चेहरा मीडियासमोर दाखवला नव्हता. अखेर गेल्या वर्षी २५ डिसेंबरला दोघांनी पहिल्यांदा राहाला सगळ्यांसमोर आणले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neetu kapoor reacts on rishi kapoor with granddaughter raha viral edited picture dpj