बॉलीवूडमध्ये ८० चं दशक गाजवणाऱ्या नीतू कपूर व झीनत अमान या दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या दोघींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय नीतू व झीनत यांनी हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन यांच्याबद्दलचे अनेक किस्से यावेळी सांगितले.

नीतू कपूर आणि जया बच्चन या दोघींमध्ये गेली कित्येक वर्षे घट्ट मैत्री आहे. त्यामुळेच ‘कॉफी विथ करण’मध्ये नीतू यांनी आपल्या लाडक्या मैत्रिणीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. जया बच्चन आणि पापाराझी माध्यमांमध्ये नेहमीच खटके उडत असल्याचे आपण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहतो. त्या अनेकदा ऑनकॅमेरा पापाराझींवर संतापतात. यावर आता नीतू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Ajit Pawar responded to opposition objections on evm machine despite mahaviaks aghadi Lok Sabha loss
लोकसभा निकालानंतर ‘ईव्हीएम’ला दोष देत बसलो नाही, अजित पवार यांची विरोधकांवर टीका
amitabh bachchan
नातीच्या शाळेतील कार्यक्रमाला गेलेल्या अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट म्हणाले…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”

हेही वाचा : “ती रस्त्यावर नव्हती…”, खर्चाच्या विधानावरून अभिनेत्रीने अंकिता लोखंडेच्या सासूला सुनावलं; म्हणाली, “दोन दिवसात…”

जया बच्चन पापाराझींवर का भडकतात? याविषयी सांगताना नीतू कपूर म्हणाल्या, “मला असं वाटतं जया आणि पापाराझींमध्ये फक्त एकदाच वाद झाला होता. त्यानंतर त्या जाणूनबुजून असं वागू लागल्या. आता पापाराझींना ओरडण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. एकीकडे जयाजी त्यांना ओरडतात आणि दुसरीकडे पापाराझी या सगळ्याची मजा घेत असतात. पण, खऱ्या आयुष्यात त्या अजिबात अशा नाहीत. त्या फारच प्रेमळ आहेत. पापाराझी आणि जया बच्चन हे दोघेही एकमेकांना मिळालेले आहेत…संगनमताने सगळं सुरू असतं. पापाराझींना देखील त्यांचा ओरडा ऐकायला आवडतं.”

हेही वाचा : एकपात्री नाटक, कबीर सिंग ते महाराष्ट्राची हास्यजत्रा! १० वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची वनिता खरात; म्हणाली, “ये तो सिर्फ…”

नीतू कपूर पुढे अभिनेत्री रेखाविषयी सांगताना म्हणाल्या, “आमच्या दोघींची मैत्री केव्हा झाली हे मला आठवत नाही. पण, रेखा म्हणजे मला भेटलेली सगळ्यात सुंदर आणि गोड व्यक्ती आहे. त्यांना अनेकांची उत्तम नक्कल करता येते आणि मुळात रेखाचा स्वभाव फारच मजेशीर, सर्वांना आपलंस करून घेणारा आहे.” नीतू कपूर यांच्या म्हणण्यावर झीनत अमान यांनी देखील सहमती दर्शवली.

हेही वाचा : Video: लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आयरा खान व नुपूर शिखरे, आई रीना दत्ताने लेक व जावयासह दिली पोज

दरम्यान, मनोरंजनसृष्टीतील मित्र-मैत्रिणींशिवाय ‘कॉफी विथ करण’मध्ये नीतू व झीनत यांनी वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्याबाबत देखील अनेक खुलासे केले. सध्या या एपिसोडची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Story img Loader