बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचा आज स्मृतिदिन आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले होते. २०२० मध्ये दीर्घ आजाराने ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आज ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. ऋषी कपूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : श्रीनगरमध्ये शाहरुख खानला चाहत्यांनी घेरलं; गर्दी बघून अभिनेत्याची झाली होती ‘अशी’ अवस्था

तीन वर्षांपूर्वी याच दिवशी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. ऋषी कपूर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आज ३० एप्रिल रोजी, ऋषी कपूर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त नीतू कपूर यांनी त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. , ‘प्रत्येक वेळी प्रत्येक चांगल्या आठवणीत तुझी आठवण येते.’ पोस्ट शेअर करताना नीतू कपूर खूपच भावनिक झाल्या होत्या.

ऋषी आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरने तिच्या वडिलांच्यास्मृतिदिनानिमित्त अनसिन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फोटोमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्याबरोबर रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समरा साहनीही दिसत आहेत.

रिद्धिमा कपूर यांनी शेअर केलेला फोटो

बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर यांनी ५० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास १२१ चित्रपट केले होते. ते खूप आनंदी व्यक्ती होते, ते दीर्घकाळ कर्करोगाशी लढा देत होते. , ३० एप्रिल २०२० रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त २०-२५ लोकच उपस्थित होते. ‘शर्माजी नमकीन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neetu kapoor share emotional post on rishi kapoor 3rd death anniversary dpj
Show comments