बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी दीवार, अमर अकबर अँथनी, खेल खेल में, याराना अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांची जोडी आजही पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नीतू कपूर यांनी १९८० साली सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्याशी लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा- मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”
नीतू म्हणालेल्या “ऋषी कपूर यांना फ्लर्ट करताना मी अनेकदा पकडलं आहे. त्यांच्या अफेअरबाबत मला सगळ्यात आधी माहीत व्हायचं. पण त्या सगळ्या गोष्टी फक्त वन नाईट स्टँड असल्याचं मला माहीत होतं. या गोष्टीवरुन आमच्यात अनेकदा वाद व्हायचे. पण आता मी माझं वागणं बदललं आहे. शेवटी हे सगळं ते कधीपर्यंत करणार आहेत? ,” असा प्रश्नही मी त्यांना विचारला असल्याचे नीतू यांनी सांगितले.
हेही वाचा- “ऑनस्क्रीन किसिंग सीन शूट करताना…”, चित्रपटातील भूमिकांविषयी जिनिलीया देशमुखने मांडलं स्पष्ट मत
नीतू पुढे म्हणालेल्या की ‘आम्हाला एकमेकांबद्दल पूर्ण खात्री आहे.. कारण मला माहित होते की त्याच्यासाठी त्याचे कुटुंब सगळं काही आहे. मला हे देखील माहित आहे की ते अनेक गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून आहे, म्हणून ते मला कधीही सोडणार नाही.”