बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा ‘कहानी’ चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजला. आता पुन्हा अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली असून यावेळी विद्या गुप्तहेराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : आलिया भट्टच्या हॉलीवूड पदार्पणासाठी महेश भट्ट आहेत उत्सुक; कौतुक करीत म्हणाले, “मला माझ्या लेकीचा…”

अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘नीयत- एक खून, अनेक रहस्य’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये विद्या बालन पूर्णपणे बदललेल्या लूकमध्ये दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ‘एके’ (आशिष कपूर) ची भूमिका साकारत असलेला अभिनेता राम कपूर आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी पार्टीचे आयोजन करतो असे दाखवण्यात आले आहे. मात्र, पार्टी सुरु असताना अचानक एकेचा (आशिष कपूर) मृत्यू होता. पुढे, या हत्येचे गूढ उकलण्याची जबाबदारी विद्या बालन सोपवण्यात येते.

हेही वाचा : “असित मोदींनी जाहीर माफी मागावी” ‘तारक मेहता’ फेम जेनिफर मिस्त्रीने केली मागणी; म्हणाली, “त्यांनी माझ्यावर…”

विद्या बालन पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला संशयाच्या नजरेतून पाहत असते. प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी करण्यात येते. अभिनेत्री या चित्रपटात मीरा राव हे पात्र साकारणार असून नेहमीच पारंपरिक लूक आणि लांब केसांमध्ये दिसणारी विद्या बालन या चित्रपटात नव्या रुपात दिसणार आहे. गुप्तहेराची भूमिका साकारण्यासाठी विद्याला बँग हेअरस्टाइल करून हटके लुक देण्यात आला आहे.

हेही वाचा : “मूठभर पाण्यात जीव द्या” ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर भडकले; म्हणाले, “संवाद ऐकून…”

विद्या बालन आणि राम कपूर यांच्याशिवाय ‘नीयत’मध्ये राहुल बोस, नीरज काबी, अमृता पुरी, शहाना गोस्वामी, निक्की वालिया, दीपन्निता शर्मा, शशांक अरोरा, प्राजक्ता कोळी, दानेश राजवी, इशिका मेहरा आणि माधव देवल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘नीयत- एक खून अनेक रहस्य’ हा चित्रपट ७ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neeyat trailer out actress vidya balan plays detective solving a murder mystery sva 00