अभिनेत्री नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मोजक्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण आतापर्यंत तिने साकारलेल्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत. नेहा कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. २०१८ मध्ये तिने बॉलीवूड अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. नेहा लग्नाआधीच गरोदर होती आणि ती गरोदर असल्याची बातमी तिने तिच्या पालकांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती हे तिने इतक्या वर्षांनी उघड केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१० मे २०१८ रोजी दिल्लीतल्या एका गुरुद्वारामध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केलं. तर यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिने लेक मेहर बेदी हिला जन्म दिला. तिच्या प्रेग्नेन्सीची खूप चर्चा रंगली होती. याचं कारण म्हणजे नेहा लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती. गरोदर असल्याचं तिने लग्नाआधी जेव्हा तिच्या घरच्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिच्यापुढे एक मोठी अट ठेवली.

आणखी वाचा : “तू तुझ्या आईला…” अभिनेत्री नेहा धुपियाची मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट व्हायरल

‘टाइम्स नाउ डिजिटल’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी जेव्हा माझ्या आई-वडिलांना गरोदर असल्याचं सांगितलं तेव्हा ते रागावले नाहीत. ही बातमी खूप चांगली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पण तुझ्याकडे लग्नासाठी फक्त ७२ तास आहेत, या दोन दिवसांत तू लग्न कर, असं त्यांनी मला सांगितलं.”

हेही वाचा : नेहा धुपियाने शेअर केला बाळासोबतचा पहिला फोटो, खास पोस्ट शेअर करत डॉक्टरांचे मानले आभार

नेहाचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. तर मध्यंतरी एका मुलाखतीत नेहाच्या वडिलांनी ती लग्नाआधीच गरोदर असल्याच्या चर्चा खोट्या आहेत, असं म्हणून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तर आता नेहाच्या या बोलण्याने सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha dhupia revealed what was her parents reaction when they came to know about her pregnancy rnv