बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या सोशल मीडियवर चर्चेत आहे. ‘ज्युली’, ‘अ थर्सडे’, ‘दे दना दन’ असे एक सो एक सुपरहिट चित्रपटातून नेहाने लोकप्रियता मिळवली. वेब सीरिजमध्येही नेहाने काम केलं आहे. अभिनयाबरोबरच नेहा तिच्या बोल्डनेसमुळेही कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. टॉवेल घेतलेला टॉपलेस फोटो नेहाने शेअर केला आहे. तिचा हा बोल्ड फोटो पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. नेहाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेहाचा हा हॉट अवतारातील फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा >> Video : बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने शेअर केला ‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘तो’ सीन, म्हणाला…
हेही वाचा >> Video: दीड महिन्यांपूर्वी आईला गमावलं, आता वडिलांना शेवटचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर
नेहाचा हा फोटो मासिकाच्या कव्हर पेजवरील आहे. ‘कॉस्मोपॉलिटन’ या मासिकासाठी नेहाने बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील हा फोटो आहे. या फोटोवर Guts असं कॅप्शन लिहलं आहे. “जागा घ्या, आवाज वाढवा, तुमची पॉवर दाखवा”, असंही या फोटोवर लिहिलेलं दिसत आहे. नेहाच्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा >> Video : लतिका शूटिंगसाठी ट्रक चालवायला गेली अन्…; ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील व्हिडीओ व्हायरल
नेहाने अभिनेता अंगद बेदीशी २०१८मध्ये लग्नगाठा बांधली. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. नेहाने अनेकदा फॅमिली ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.