मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. कोणत्या ना कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र, असेही काही कलाकार आहेत, ज्यांना कायम संघर्ष करावा लागतो. सहजासहजी चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नाही. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने आपल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली नेहा धुपिया?

‘बॉलीवूड हंगामा’ला अभिनेत्रीने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने एक कलाकार म्हणून तिला कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले आहे. ती म्हणते, मी अशा ठिकाणाहून आले आहे, जिथे मी गेल्या २२ वर्षांपासून स्वत:ला चांगल्या चित्रपटाशी जोडण्यासाठी संघर्ष करत आहे. मी ज्या चित्रपटात काम केले आहे, ते चित्रपट काही वेळा बॉक्स ऑफिसवर चांगले काम करतात. काही वेळा प्रेक्षक चित्रपटांकडे पाठ फिरवतात. माझे चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण मला सांगतात, “मला तुमची ही भूमिका आवडली”, “या चित्रपटात केलेले काम चांगले होते.” मग मला प्रश्न पडतो, जर माझे काम तुम्हाला आवडले असेल तर आपण एकत्र येऊन काही काम का नाही करू शकत? अभिनेत्री पुढे म्हणते की, मला बॉलीवूडमधून हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी कधी ऑफर आली होती, फोन आला होता असा प्रश्न कोणी विचारला तर मला आठवत नाही, असं त्याचं उत्तर आहे. पण, मला दाक्षिणात्य चित्रपटासाठी ऑफर आल्या, असे तिने या मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. पुढे तिने म्हटले की, जेव्हा ‘बॅड न्यूज’ चित्रपटात काम करण्यासाठी तिला विचारले, तेव्हा तिला खूप आनंद झाला होता.

Mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च माहितीये का? म्हणाली, “गेल्या पाच वर्षात…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
Ameesha Patel
“यांच्यानंतर बॉलीवूडचं काय होणार…”, अमीषा पटेलने ‘शेवटचे सुपरस्टार’ म्हणत घेतली ‘या’ अभिनेत्यांची नावं
Pulkit Samrat ex wife Shweta Rohira road accident
हाडं मोडली, ओठ चिरला अन्…; बॉलीवूड अभिनेत्रीचा भीषण अपघात, फोटो पाहून चाहते काळजीत
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”

हेही वाचा: “फिल्मी क्षेत्रातल्या महिला मैत्रिणी होऊ शकत नाहीत, एकमेकींवर जळतात”, आशा भोसलेंचं स्पष्ट मत; म्हणाल्या…

अभिनेत्री पुढे म्हणते, मी अशा १२० कलाकरांमध्ये येते, जे चित्रपटाचे गणित बदलवू शकत नाहीत. कारण आमच्यासाठी प्रेक्षक तिकीट काढून चित्रपट पाहायला येणार नाही. आम्ही ते कलाकार आहोत, जे तिथे जाऊन काम करतील आणि कामाचे पैसे घेतील. आमच्यामुळे जास्त पैसे कमावले जाऊ शकत नाही. आम्हाला वाटले की चित्रपट नाही तर कमीत कमी ओटीटीचे माध्यम आहे. मात्र, सगळीकडे पाहरेकरी आहेत; कोणालाही धोका पत्करायचा नाही. नेहाने २००३ साली ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

दरम्यान, नेहा धुपिया नुकतीच विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात दिसली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची चर्चा सुरू होती. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader