बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. गाण्यांव्यतिरिक्त नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने २०२० मध्ये रोहनप्रीतशी लग्नगाठ बांधली होती. दोघेही बी टाउनमधील लाडके कपल आहे. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण, या दोघांमध्ये सगळं आलबेल नसल्याची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा – “माझं बॉबीवर खूप प्रेम होतं, पण…”; ५ वर्षांच्या अफेयरनंतर नीलमने सांगितलेलं ब्रेकअपचं कारण
नेहाच्या वाढदिवसाला रोहनप्रीत हजर नव्हता, इतकंच नाही तर तिच्या वाढदिवसानिमित्त रोहनप्रीतने नेहासाठी कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. नेहाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्येही तो दिसत नाहीये, त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा तर आला नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहते नेहाच्या वाढदिवसाच्या फोटोंवर कमेंट करून ‘रोहनप्रीत कुठे आहे?’ असे प्रश्न विचारत आहे.
नेहा कक्करने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये तिचे कुटुंब, मित्र, क्रिकेटर युजवेंद्र चहल पत्नी धनश्रीसोबत दिसला. मात्र रोहनप्रीत या फोटोंमधून गायब होता. तसेच रोहनने नेहासाठी वाढदिवसाची कोणतीही पोस्ट लिहिली नाही. हे पाहिल्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
‘नेहुचा रोहू कुठे बेपत्ता झालाय’, ‘रोहनप्रीत कुठे आहे’, ‘रोहनप्रीत दिसत नाहीये, तुम्हा दोघांमध्ये सगळं ठिक आहे ना?’ अशा कमेंट्स या पोस्टवर चाहते करत आहेत.
नेहा कक्करच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहाने २४ ऑक्टोबर २०२० रोजी रोहनप्रीत सिंगशी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. तसेच दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर आता अचानक नेहाच्या वाढदिवसाला रोहनप्रीत नसल्याने या दोघांच्या चाहत्यांना काळजी वाटत आहे.