मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली होती. या मलिकांवर सामूहिक बलात्कारही झाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर बॉलीवूड कलाकारांनी रोष व्यक्त केला होता. पण कंगना रणौतने मणिपूर घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोडने टीका केली आहे.
“मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”
“दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली तर संपूर्ण भारतीय संस्कृती आणि धर्म धोक्यात आला, पण जमावाने आदिवासी मुलींची नग्न परेड केली तेव्हा जणू काही घडलंच नाही! माझे पुतळे जाळणारा तो महिला मोर्चा कुठे गेला? कुठे आहेत ते दरबारी कवी आणि गायक जे मला उत्तर द्यायला उत्सुक होते? सरकारला मी विचारलेल्या प्रश्नांना अर्थहीन म्हणणारे म्हणणारे गायक कोणत्या बिळात लपले आहेत? आजकाल कंगना जी सुद्धा सायलेंट मोडमध्ये आहे! काय झालं! आता महिलांच्या हक्कांवर बोलणार नाही का?” असा प्रश्न नेहाने विचारला आहे.
दरम्यान, नेहा राठौडने मणिपूरमधील घटनेवर एक कविता म्हणत सरकारला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्वीट करत तिने टीका केली आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारच्या धोरणांवर समाजमाध्यमांवर टीकात्मक गाणं बनवल्यामुळे नेहा अडचणीत आली होती.
मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”
‘यूपी में का बा’ या गाण्यातून नेहाने सामाजिक भावना भडकविल्याचा आरोप करण्यात आला होता आणि तिला पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्या घटनेचा उल्लेख करत आता नेहाने उत्तर प्रदेशमधील गायकांना आणि तिच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना सुनावलं आहे. तसेच कंगना रणौत मणिपूर प्रकरणावर गप्प का आहे, आता महिलांच्या हक्कांबाबत का बोलत नाही, असा सवालही तिने केला आहे.