सिनेविश्वात काम करताना कलाकारांना शूटिंगच्या कामानिमित्त परदेशात विविध ठिकाणी फिरावे लागते. यावेळी त्यांना आलेले अनुभव कलाकार नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असतात. अशात बॉलीवूड अभिनेता नील नितीन मुकेशने नुकताच न्यूयॉर्कमधील एक प्रसंग सांगितला आहे. येथे तो भारतीय आहे यावर अधिकारी विश्वास ठेवत नव्हते, असा खुलासा त्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नील नितीन मुकेशने नुकतीच ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली आहे. साल २००९ मध्ये नीलचा ‘न्यूयॉर्क’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात कतरिना कैफ आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्व कलाकार तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होते. त्यावेळी नीलने त्याला आलेल्या अनुभवचा आता खुलासा केला आहे.

“मला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. मी एक भारतीय नागरिक आहे आणि माझ्याकडे त्याचा पासपोर्टही आहे, हे मानण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तेथील अधिकारी तयार नव्हते. त्यांनी मला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी किंवा त्यांना काही उत्तर देण्यासाठीही वेळ दिला नाही”, असं नील नितीन मुकेशने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

चार तास केली चौकशी

“सुरुवातीला साध्या पद्धतीने सुरू झालेली चौकशी पुढे तब्बल चार तास सुरू राहिली. चौकशी करत असताना मी तब्बल चार तास त्यांच्या नजरकैदेत होतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता, त्यामुळे मला त्यांना माझी खरी ओळख पटवून देता येत नव्हती”, असं नील म्हणाला.

परिस्थिती नियंत्रणात कशी आली?

अभिनेत्याला पुढे ही परिस्थिती नियंत्रणात कशी आणली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने सांगितलं की, “चार तास नजरकैदेत ठेवल्यावर ते माझ्याकडे आले आणि मला विचारू लागले, ‘तुला यावर काय म्हणायचे आहे?’ त्यांच्या या प्रश्नावर मी त्यांना एकच उत्तर दिलं. मी म्हणालो, मला गूगल करून पाहा.”

“त्यांनी गूगल करताच बोलण्याची पद्धत आणि लहेजा बदलला. ते माझ्याशी शांततेने आणि संयमाने नाही तर आपुलकीने बोलू लागले. पुढे त्यांनी मला माझ्या कुटुंबातील पार्श्वभूमी विचारली”, असं नील नितीन मुकेशने सांगितलं.

नील नितीन मुकेशच्या कुटुंबातील पार्श्वभूमीविषयी बोलायचे झाल्यास, तो भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक नितीन मुकेश आहेत, तर आजोबा मुकेश यांनीही बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

नील नितीन मुकेशने सिनेविश्वात बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. ‘विजय’ आणि की ‘जैसी करनी वैसी भरनी’ या दोन चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. ‘न्यूयॉर्क’ चित्रपटानंतर तो ‘जेल’, ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘७ खून माफ’, ‘शॉर्टकट रोमियो’ या आणि अशा अनेक चित्रपटांत त्याने कामे केली आहेत.