अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी व अभिनेत्री अवनीत कौर यांच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाचा ट्रेलर १४ जून रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अभिनयक्षेत्रात नाव कमवू इच्छिणाऱ्या दोन कलाकारांची कहाणी दाखवण्यात आली आहे. तसेच यात ४९ वर्षीय शेरू आणि २१ वर्षीय टिकूची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नवाजुद्दिन सिद्दिकी करणार २१ वर्षीय अभिनेत्रीबरोबर रोमान्स; बहुचर्चित ‘टिकू वेड्स शेरू’चा ट्रेलर प्रदर्शित

Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका सीनमुळे वादाला तोंड फुटलं आहे. या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकी व अवनीत कौर यांचा रोमान्स व किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. हा किसिंग सीन पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. नवाजुद्दिन ४९ वर्षांचा आहे तर अवनीत २१ वर्षांची आहे. त्यामुळे दोघांच्या वयातील अंतराचा उल्लेख करत नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहे. या चित्रपटाची निर्माती कंगना रणौत आहे, अनेकांनी कंगनालाही ट्रोल केलंय.

‘नवाज २८ वर्षांनी लहान अवनीतला किस करतोय’, असं एका ट्विटर युजरने फोटो शेअर करत म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवरही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. तिथेही ट्रेलरवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. ‘बापलेक वाटत आहेत दोघेही, त्यातही दोघांचा किसिंग सीन, अनर्थ झाला,’ ‘ही अभिनेत्री आपल्या वडिलांच्या वयाच्या अभिनेत्याबरोबर काय करतेय’, ‘एवढ्या लहान मुलीबरोबर तिच्या वडिलांच्या वयाचे अभिनेते कसे काम करतात’, ‘कंगनाने बीएमसीकडून परवानगी घेतली असेल’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी या ट्रेलरवर करत आहेत.

Tiku Weds Sheru kissing scene troll
टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलरवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स

दरम्यान, हा चित्रपट २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार होता, पण निर्मात्यांनी निर्णय बदलत तो ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे.

Story img Loader