सध्या सर्वसामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूड कलाकारही सण अगदी थाटामाटात साजरे करत आहेत. कोविडमुळे २ वर्षं एकमेकांपासून दूर राहून सण साजरे करणारे सेलिब्रिटी पुन्हा दिवाळी पार्टीजमध्ये दिसू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये चांगलंच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या घरी खासगी पार्ट्या आयोजित केल्या आहेत. अभिनेत्री क्रीती सनॉनने ही दिवाळीनिमित्त एक जंगी पार्टी दिली आहे.
सध्या बॉलिवूडचा सर्वोत्तम फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या खासगी दिवाळी पार्टीची सगळीकडेच चर्चा होत आहे. या पार्टीतील सेलिब्रिटीजचे फोटोजसुद्धा चांगलेच व्हायरल होत आहेत. तमाम बॉलिवूडकरांनी या पार्टीत हजेरी लावली. विकी-कतरिना, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सारा अली खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, सुहाना खान, अनन्या पांडे अशा कित्येकांनी या पार्टीत हजेरी लावली.
शाहरुखची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे या दोघी एकत्रच या पार्टीत दाखल झाल्या. सध्या सोशल मीडियावर दोघींच्या लूकची जबरदस्त चर्चा सुरू आहे. अनन्यापेक्षा या पार्टीत सुहानाच जास्त भाव खाऊन गेल्याचं स्पष्ट होत आहे. तिने परिधान केलेली डिझायनर साडी आणि एकंदरच तिचा हा बोल्ड आणि पारंपरिक अवतार चांगलाच व्हायरल होत आहे. सुहानाची हेअर स्टाइल, साडी, दागिने हे पाहता नेटकऱ्यांनी तिची तुलना दीपिका पदूकोणशी केली आहे.
या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत सुहाना दीपिकासारखीच दिसत आहे अशा कॉमेंट केल्या आहेत. सुहानाच्या या लूकमुळे तिचे चाहते चांगलेच गोंधळले आहेत. काहींनी तर ‘किंग खानची दीपिका लाइट’ अशी कॉमेंटही केली आहे. याबरोबरच या लूकमुळे सुहाना चांगलीच ट्रोलदेखील झाली आहे. नेसलेली साडी नीट सांभाळता येत नसल्याने लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. शिवाय काही लोकांनी तिला आँटी म्हणूनसुद्धा हिणवलं आहे. सुहाना झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या नेटफ्लिक्स वेबसीरिजमधून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.