Anil Mehta Death: मलायका अरोराचे (Malaika Arora) सावत्र वडील अनिल मेहता यांनी बुधवारी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे भागातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. अनिल मेहता यांच्या अंत्यदर्शनाला आज अनेक बॉलीवूड कलाकार पोहोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायकाच्या सावत्र वडिलांचे निधन झाल्यानंतर खान कुटुंबीय खंबीरपणे तिच्या पाठिशी दिसत आहेत. अनिल मेहता यांचे निधन झाल्याचे कळताच सर्वात आधी मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान (Arbaaz Khan) तिथे पोहोचला होता. त्यानंतर त्याचे वडील सलीम खान, भाऊ सोहेल खान, आई सलमान खान हे सर्वजण आले होते. अरबाजच्या बहिणी अलविरा व अर्पिता या दोघीही रात्री मलायकाच्या कुटुंबियांची भेट घ्यायल्या आल्या होत्या.

“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर

आज गुरुवारी अरबाज व त्याची दुसरी पत्नी शुरा खान दोघेही अनिल मेहता यांच्या अंत्यदर्शनाला आले. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. फिल्मीज्ञान या अकाउंटवरून अरबाज व शुराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर

मलायका अरोरा व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या पद्धतीने अरबाज व त्याचे कुटुंबीय या कठीण काळात मलायकाला सपोर्ट करत आहेत ते पाहून नेटकरी कौतुक करत आहे. यालाच माणुसकी म्हणतात, ज्या पद्धतीने खान कुटुंबीय मलायकाच्या कुटुंबासाठी उभे आहेत ते कौतुकास्पद आहे, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

फोटोंवरील कमेंट्स
फोटोंवरील कमेंट्स

अनिल मेहता यांनी (६५) यांचा बुधवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मेहता यांची पत्नी जॉयसी पॉलीकार्प या घरातच होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens praised arbaaz khan shura khan for supporting malaika arora father anil mehta death hrc