आमिर खानची लाडकी लेक आयरा आता शिखरेंच्या घरची सून झाली आहे. काल, ३ जानेवारीला आयरा व नुपूर शिखरे लग्नबंधनात अडकले. दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यामुळे सध्या आयरा व नुपूर शिखरेच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओवर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील आमिर खानचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमधील आमिरची ती कृती पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरा खानच्या लग्नातील आमिरचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लेकीच्या लग्नात आलेल्या पापाराझींबरोबर आमिर हात मिळवत त्यांचे आभार मानताना दिसत आहे. तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहे. आमिरच्या याच कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आमिरने पापाराझींना दिलेली वागणूक पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – Video: “हा नागिन ड्रेस…”, लग्नातील आयरा खानचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

आमिरच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एखाद्याचा आदर करेन हे असतं”, “खूप छान”, “बडे दिल वाला”, अशा अनेक प्रतिक्रिया आमिरच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत; ‘तो’ कमेंट करत म्हणाला…

दरम्यान, आमिर खानचा जावई हा मराठी आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. Fitnessismची सुरुवात त्याने केली होती. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान, आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens praises aamir khan for his paparazzi greeting in daughter ira khan wedding pps