२०१२ साली हिट झालेल्या ‘ओएमजी’ (ओ माय गॉड) या चित्रपटाचा ‘ओएमजी २’ (OMG 2) हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज ‘ओएमजी २’ या चित्रपटाची दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आली. एका पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमार भगवान शंकराच्या अवतारात दिसत आहे. तर, दुसऱ्या पोस्टरमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी हा त्याच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळत आहे. ‘ओएमजी २’ची ही दोन्ही पोस्टर अक्षय कुमारनं सोशल मीडियावर शेअर केलीआहेत. मात्र, हे पोस्टर पाहून नेटकरी संतापल्याचे पाहायला मिळत आहे. “हिंदू धर्माचा अपमान करणारा चित्रपट नसावा, हीच अपेक्षा,” असं नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा – “मी अजय देवगणविरोधात खटला दाखल केला तर…”; काजोलनं सांगितलं काय होईल

udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kriti Sanon joins tere ishq mein
Video : दंगल, जाळपोळ अन् मनात प्रेमाचं वादळ; ‘तेरे इश्क में’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा पहिला व्हिडीओ आला समोर
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

‘ओएमजी’ या चित्रपटात अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता ‘ओएमजी २’मध्ये अक्षय भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे. पोस्टरमध्ये कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा शंकराच्या अवतारात अक्षय दिसत आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत लिहिलं की, ‘ओएमजी २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येईल.” तर पंकज त्रिपाठी असलेला दुसरे पोस्टर शेअर करत अक्षयनं लिहिलंय, ‘सत्याच्या मार्गावर भेटू.’

हेही वाचा – Video: “ते कधीच…,” नितीन गडकरींनी सांगितली शरद पवारांबद्दल खुपणारी गोष्ट

हे पोस्टर पाहून एक नेटकरी म्हणाला, ‘जर या चित्रपटात हिंदू धर्माविषयी काही उलटसुलट दाखवलं, तर काही खैर नाही. कारण- बॉलीवूडचे चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा त्यात हिंदू धर्माविषयीच अपमानजनक चित्रण दाखवलं जातं. तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. जय महाकाल.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं थेट इशारा देत लिहिलंय, ‘हिंदू धर्माचा अपमान केला तर विचार करा काय होईल?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलंय, ‘आता ‘आदिपुरुष’नंतर भगवान शंकराबरोबर चेष्टा नको.”

हेही वाचा – सकीना-तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये नाना पाटेकरांची दमदार एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत

‘ओएमजी २’ चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीव्यतिरिक्त अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ११ ऑगस्टला ‘ओमएमजी २’ या चित्रपटाबरोबर सनी देओल व अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर २’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिक्वेल चित्रपटांची चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

Story img Loader