दिग्गज हिंदी चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा गुरुवारी (२१ डिसेंबर ) ६० वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलीवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. पण या पार्टीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते सलमान खान आणि बच्चन यांच्या भेटीने.

सलमान खानने मंचावर महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. त्यांची गळाभेट घेतल्यानंतर सलमानने अभिषेकला मिठी मारली. त्यानंतर मंचावर सलमान खान अभिषेक बच्चन बराच वेळ एकमेकांशी बोलत होते, असं दिसून आलं. त्यांचा हा व्हिडीओ ‘वरिंदर चावला’ या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

Video: सलमान खान आला, अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली अन् शेजारी असलेल्या अभिषेकला…, तिघांचाही व्हिडीओ चर्चेत

सलमान खान व अभिषेक बच्चन यांचा व्हिडीओ पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहे. खरं तर चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. ‘मुलांची त्यांच्या एक्स पार्टनरच्या विद्यमान पार्टनरशी मैत्री असू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण,’ काहींना अभिषेकला टोला लगावला आहे. ‘अभिषेकला आता इंडस्ट्रीत काम मिळेल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

ss
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
ss
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘सर्वांनी त्याच्याबद्दल म्हटल्याप्रमाणे, तो या इंडस्ट्रीतील सर्वात दयाळू आणि शुद्ध मनाचा अभिनेता आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर एका नेटकऱ्याने अभिषेक व ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चांचा संदर्भ देत मजेशीर कमेंट केली आहे. ‘तुम्ही दोघे उगाच नाटकं करू नका, माझ्या आशा पुन्हा पल्लवीत होत आहेत,’ असं या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

SS
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, सलमान खान व अभिषेकच्या या व्हिडीओला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे.

Story img Loader