‘आदिपुरुष’च्या टीझरमुळे सोशल मीडियावर चांगलंच वातावरण तापलं. लोकांनी चित्रपटाची कठोर शब्दांत निंदा केली होती. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट, प्रभू श्रीराम यांचं चित्रण, रावणाचं सादरीकरण सगळंच लोकांना खटकलं आणि मग बॉयकॉट ट्रेंडने पुन्हा डोकं वर काढलं. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनोज मुंतशीर यांनी यावर स्पष्टीकरणसुद्धा दिलं. तरीही अजूनही या चित्रपटाला चांगलाच विरोध होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तर या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असल्याचं वृत्त समोर येत आहे. सोशल मीडियावर आणि काही मीडिया रीपोर्टनुसार ओम राऊत यांनीच हा निर्णय घेतला असल्याची चर्चा होत आहे. ‘आदिपुरुष’ हा जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता तो २०२३ च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : “माझ्या अटकेमागे सलमान खानचा हात नाही” बॉलिवूड अभिनेत्याने मागितली भाईजानची माफी, नेमकं काय घडलं?

यामागचं कारण नेमकं काय असावं याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. २०२३ च्या जानेवारी महिन्यात सुपरस्टार चिरंजीवी यांचा ‘वाल्टेयर वीरय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तसेच त्याच काळात नंदमुरी बालकृष्णन यांचा ‘वीरा सिम्हा रेड्डी’ हा चित्रपटही झळकणार आहे. शिवाय यांच्याबरोबरीनेच सुपरस्टार विजयचा ‘वारीसु’सुद्धा त्याच दरम्यान प्रदर्शीत होणार असल्याने ‘आदिपरूष’च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतकंच नाही तर चित्रपटावर झालेल्या टिकेमुळेसुद्धा हा निर्णय घेतला गेला असू शकतो असं म्हंटलं जात आहे. याच्या टीझरची चांगलीच आलोचना झाली होती. अजूनतरी ओम राऊत किंवा निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. ‘आदिपुरुष’चं बजेट ५०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे, यामध्ये प्रभासबरोबर क्रीती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.