सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी दोघेही शनिवारी जुहू येथील पीव्हीआरमध्ये एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी इब्राहिम आणि पलकने मॅचिंग कपडे घातले होते. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, चित्रपटगृहाबाहेर पापाराझींना पाहून इब्राहिम अली खानने काहिशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून नेटकऱ्यांनी इब्राहिमला ट्रोल केले आहे.
हेही वाचा : “ब्रा, ओल्ड मॉन्क…”, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील आक्षेपार्ह शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
पापाराझी इन्स्टाग्राम पेजेसवर इब्राहिम अली खानचे चित्रपटगृह परिसरातील अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये त्याच्या हातात पलक तिवारीचे जॅकेट दिसत आहे. बाहेर पापाराझींना पाहून इब्राहिम फोनवर “मीडिया मेरे मुंह में घुस गया है” असे बोलताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या एक व्हिडीओमध्ये “तुम्ही लोकं इथून निघून जा…” असे इब्राहिम रागात सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
इब्राहिम अली खानचे जुहू पीव्हीआर परिसरातील सगळे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल करण्यात आले आहेत. त्याची मीडियाशी वागण्याची पद्धत पाहून नेटकऱ्यांनी इब्राहिमला खडेबोल सुनावत ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले आहे की, “अजून हा अभिनेता पण झाला नाही तरीही असा वागत आहे…पुढे काय करणार काय माहिती?”
दुसऱ्या एका युजरने, “तुझी अजिबात लायकी नाही, सैफ अली खानमुळे ही मीडिया तुझ्या मागे येत आहे.” अशी संतप्त प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे. आणखी एका युजरने कमेंट करत, “पापाराझींनी अशा लोकांच्या मागे जायचेच नाही” असे लिहिले आहे.
हेही वाचा : टीआरपीमुळे ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका बंद होणार
दरम्यान, इब्राहिम अली खान लवकरच एका चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे त्याची बहीण आणि अभिनेत्री सारा अली खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. तर, पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.