बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर विवाहबंधनात अडकली आहे. स्वराने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहादबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता स्वराने हळदी, संगीत, मेहंदी व कव्वाली नाईटचं आयोजन केलं होतं. याबरोबरच स्वरा व फहादचा वेडिंग रिसेप्शन सोहळाही नुकताच पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वरा व फहादच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनीही स्वराच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. स्वराच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी जया यांनी पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. विरल भय्यानी या पेजवरुन जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> शत्रुघ्न सिन्हांबरोबर अफेअर, पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न अन्…; रीना रॉयशी घटस्फोटाच्या ३३ वर्षांनंतर मोहसिन खान यांनी सोडलं मौन, म्हणाले…

स्वराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये जया बच्चन मास्क लावून आल्या होत्या. यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. “बरं झालं मास्क लावून आलात. असंही कोणाला तुम्हाला बघायला आवडत नाही” असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “बच्चन आडनाव काढून टाकलं तर असंही हिला कोणीही ओळखणार नाही”, अशी कमेंट केली आहे. “उलट-सुलट काही बोलली नाही का?” असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. “मास्क लावून कोण जेवतं?” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> “कंगना रणौतचे चित्रपट बघता का?” कौतुकाचा वर्षाव करत संजय राऊत म्हणाले, “ती एक…”

स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधीही स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनला उपस्थित होते. स्वरा व फहादचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens troll jaya bachchan for wearing mask in swara bhasker fahad ahmad wedding reception video kak