ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मार्गोट रॉबी, रायन गॉस्लिंग, अमेरिका फेरेरा, सिमू लियू, केट मॅकिनॉन असे जबरदस्त कलाकार असलेल्या ‘बार्बी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक खासकरून हा चित्रपट पाहण्यासाठी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून जाताना दिसत आहेत. अशातच एका लोकप्रिय गायकानं गुलाबी रंगाचे कपडे घालून चित्रपटाला जाणं हे नेटकऱ्यांना खटकलं आहे. त्यामुळे हा गायक गुलाबी रंगाच्या कपड्यांमुळे ट्रोल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलीवूडमध्ये ‘प्रिंस ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय गायक अरमान मलिक नुकताच ‘बार्बी’ चित्रपट पाहण्यासाठी गुलाबी कपड्यांमध्ये गेला होता. त्यासंबंधीचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अरमान गुलाबी रंगाची हुडी व शॉट पँटमध्ये दिसत आहे. यावेळेस तो पापाराझींना म्हणतो, ‘आज सर्वजण गुलाबी रंगाच्या कपड्यात दिसत आहेत ना..अन् हसतो.’ त्यानंतर अरमान आपल्या गर्लफ्रेंडबरोबर चित्रपटगृहात जाताना दिसत आहे. तसेच तो शेवटी पापाराझींना खासगी आयुष्य आहे, आता जा, अशी विनंती करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – जयंत सावरकरांच्या निधनावर अभिनेत्री रुपाली भोसलेची भावुक पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अण्णा तुम्ही…”

हेही वाचा – “दिग्दर्शक ब्रेस्ट साइज विचारायचे अन्….” शर्लिन चोप्रानं सांगितला धक्कादायक अनुभव

अरमानचा हा व्हिडीओ त्याच्या गुलाबी रंगाच्या कपड्यांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी गायकाला या कपड्यावरून चांगलंच ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाली, “गुलाबी रंग हा फक्त मुलींनाच चांगला दिसतो.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “तू गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेस. याचा अर्थ तू गे आहेस.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे, “तू पिंकी बनला आहेस.”

हेही वाचा – “मला असे विषय त्रास देतात,” ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवरील वेब सीरिजबद्दल मधुराणी प्रभुलकरने मांडले स्पष्ट मत; म्हणाली “माझं डोकं…”

दरम्यान, अरमान मलिक हा लाइफस्टाइल ब्लॉगर आशना श्रॉफला डेट करीत आहे. दोघं नेहमी एकमेकांमधील प्रत्येक क्षणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात. नुकताच अरमानचा वाढदिवस झाला. तेव्हा आशना हिनं या गायकासाठी खास पोस्ट शेअर केली होती.