अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ६ जानेवारी रोजीसमाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर रजिस्टर लग्न केलं. महिनाभर लग्नाची बातमी गुलदस्ता ठेवल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी त्यांचं लग्न झालं असल्याचं जाहीर केलं. इतकंच नाही तर दोघांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीमध्ये स्वराच्या आजी-आजोबांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. स्वरा व फहादच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांना ११ मार्च रोजी सुरुवात झाली आहे. नुकतेच स्वराने तिच्या आणि फहादच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. शिवाय हळदीबरोबरच स्वरा व फहाद होळी खळले. हे फोटो पोस्ट करतात तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : “धर्मांतर केल्यानंतर तुझं…” फहाद अहमदबरोबर गुपचूप लग्न उरकल्यानंतर स्वरा भास्कर ट्रोल

एका नेटकऱ्याने लिहिलं, “कबूल है कबूल है झालं होतं की फेरे?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “भावा बहिणीची जोडी.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “फहादला काय काय करावं लागतंय…” आणखी एक नेटकरी म्हणाला, “इस्लाम धर्मात होळी खेळू शकतो?” अशा विविध कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

हेही वाचा : “माझा हात हातात घेतल्याबद्दल…” स्वरा भास्करचा पती फहाद अहमदचं ट्वीट चर्चेत

स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आता या दोघांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens troll swara bhaskar for celebrating holi and haldi ceremony rnv