अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यात एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. या दोघींच्या मैत्रीची सगळीकडे चर्चा व्हायची. अनेकदा दोघींना एकमेकींबरोबर वेळ घालवताना पाहिलं आहे. मात्र, आता दोघींच्या मैत्रीत दुरावा आला आहे. या दोन्ही अभिनेत्री आजही एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी असल्यासारखं दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात दोघींमध्ये पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. आलिया आणि कतरिनाचा एक जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने कतरिनाबरोबर केलेल्या वर्तनावरुन नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी तिला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे.

हेही वाचा- Video: “ही पूर्ण वेळ नशेतच…”, बॉडीगार्डला धडकणाऱ्या निसा देवगणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “ही काजोलची…”

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”

कतरिना आणि आलिया भटने नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ’ या चॅट शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी एकसारखेच कपडे परिधान केले होते. या चॅट शोमध्ये नेहा आलियाला विचारते, “तुला जर कतरिनाची एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तर तू कोणती भूमिका निवडशील?” या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच आलिया तिची जीभ बाहेर काढून विचित्र तोंड करताना दिसत आहे. वेळ संपली तरी आलियाला प्रश्नाच उत्तर देता आलं नाही. त्यामुळे आलियाला शिक्षा म्हणून तिला मिर्ची खावी लागते. आलियाच्या या वागणूकीनंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

Throwback: When Alia couldn’t name a single role of Katrina’s she would want to steal. I mean she could have said something considering that they call themselves BFFs.
by u/Master_BenKenobi in BollyBlindsNGossip

नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट करत आलियावर निशाणा साधला आहे. एकाने आलियाला बॉयफ्रेंड चोर म्हणलं आहे. आलियाने तिच्या बॉयफ्रेंडला चोरलं, तुम्ही भूमिकेबद्दल बोलताय तर दुसऱ्या युजरने ती राजनिती किंवा अजब गजब प्रेम कहानी अशा चित्रपटांची नावं घेऊ शकत होती. इतकंच नव्हे तर ‘नमस्ते लंडन’ किंवा ‘सिंग इज किंग’ म्हटलं असतं तरी चाललं असतं. ती स्वत:ला कतरिनाची चांगली मैत्रीण म्हणते, मग एखादं तरी नाव ती घेऊच शकली असती’, असं म्हणत नेटकऱ्यांनी आलियावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा- वरुण धवन आलिया भट्टला आमिर खान या टोपण नावाने मारतो हाक; कारण सांगत म्हणाला, “ती २०-२१ वर्षांची…”

जवळपास सहा वर्ष रणबीर आणि कतरिना रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नव्हे तर लिव्ह रणबीर-कतरिनाने इनमध्येही राहायला सुरुवात केली होती. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि रणबीर-कतरिनाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर रणबीरने गेल्या वर्षी आलिया भट्टशी लग्न केलं. तर कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत सात फेरे घेतले.

Story img Loader