अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच करिश्माने ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’ला भेट दिली व तिथे ‘हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स’मध्ये तिने सहभाग घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या इव्हेंटचे काही फोटोज शेअर केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. लोकांनी आणि सेलिब्रिटीजनी करिश्माचं कौतुक केलं, पण काहींनी मात्र तिला भरपुर ट्रोलही केलं आहे. नेटकऱ्यांनी करिश्माला ट्रोल करत तिच्या शिक्षणावर आणि बौद्धिक कुवतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

आणखी वाचा : “मी सलमानपासून दूरच…” रवी किशन यांनी सांगितला ‘तेरे नाम’च्या सेटवरील अनुभव

मीडिया रिपोर्टनुसार करिश्मा कपूरने पदवीचं शिक्षण घेतलेलं नसून तिने केवळ १२वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. पुढे तिने पदवीसाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, परंतु चित्रपटात पदार्पण केल्याने तिचा शिक्षणातील रस निघून गेला अन् तिने कॉलेजचं शिक्षण अर्धवटच सोडून दिलं. यामुळेच तिला आता नेटकरी ट्रोल करत आहेत. लोकांनी करिश्माला सोशल मीडियावर चांगलंच धारेवर धरलं आहे.

एका युझरने करिश्माचा हार्वर्डमधील फोटो शेअर करत लिहिलं, “हार्वर्ड यूनिवर्सिटीची पातळी एवढी खाली गेली आहे की त्यांनी करिश्मा कपूरला भाषण द्यायला बोलावलं आहे. एक अशी बॉलिवूड अभिनेत्री जी पदवीधरही नाही.” काहीच वेळात या फोटोवरही लोकांनी कॉमेंट करत करिश्माला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिलं, “हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड बाजूला ठेवा, आयआयएम किंवा आयआयटी मध्ये बोलवतील हिला तेव्हा खरं.”

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया

आणखी एका युझरने तर करिश्माची तुलना थेट लालू प्रसाद यादव यांच्याशी केली. त्याने कॉमेंटमध्ये लिहिलं नाही. “मला याची खात्री नाही, पण मला एक मित्राने सांगितलेलं की हार्वर्डच्या मंडळींनी लालू प्रसाद यादव यांनाही एकदा बोलावलं होतं.” तर काहींनी करिश्माची बाजू घेत कॉमेंटमध्ये तिला सावरायचा प्रयत्न केला आहे. एकाने कॉमेंटमध्ये लिहिलं, “माणसाकडे असलेलं ज्ञान हे कोणत्याही डिग्रीपेक्षा श्रेष्ठ असतं. करिश्मा त्याकाळातील एक उत्कृष्ट अभिनेत्री होती.” लवकरच करिश्मा कपूर ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. प्रेक्षक तिच्या या कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens trolled karishma kapoor who went to harvard business school for lecture avn