अजय देवगण व काजोल यांची लेक निसाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण ती सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. ती आपल्या मित्रांबरोबर पार्टी करताना किंवा इव्हेंटमध्ये जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते. निसा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे बऱ्याचदा चर्चेत असते. अनेकदा ती धडपडतानाही दिसते. असाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – गणितात १०० पैकी १००, इंग्रजीत ९० अन्… समांथाची १०वीची मार्कशीट व्हायरल, अभिनेत्रीला किती गुण मिळाले होते?

‘विरल भयानी’च्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात निसा तिचा बेस्ट फ्रेंड ओरी ओवत्रामणीबरोबर डिनरसाठी पोहोचली. दोघेही एकाच कारमधून खाली उतरले. निसा कारमधून उतरत असताना बॉडीगार्ड अचानक पोहोचतो, त्यामुळे ती त्याला धडकणार धडकते. यात तिचा तोल जाणार असतो, पण ती स्वतःला सांभाळते व हसत पुढे जाते. निसाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं आहे.

“ही कधी नॉर्मल चालते का?” अशी कमेंट एका युजरने केली आहे.

nysa troll 1
निसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“ही पूर्ण वेळ नशेतच असते काय?” असं एका युजरने म्हटलं आहे.

nysa troll
निसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

“ती काजोलची मुलगी आहे, हे तिने सिद्ध केलंय, काजोल पण नेहमीच अशी धडपडत असते,” असी कमेंट एका युजरने केली आहे.

nysa troll
निसाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, निसा देवगण कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. बऱ्याचदा तिच्या लूकवरून नेटकरी तिला ट्रोल करत असतात.

Story img Loader