सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अगदी तोंडावर आली आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बूकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असतानाच या चित्रपटातील नव्या गाण्यामुळे सलमान खानवर नेटकरी चांगलीच टीका करत आहेत.
या चित्रपटातील ‘लेट्स डान्स छोटू मोटू’ हे गाणं काल प्रदर्शित झालं. ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार… ” असे या गाण्याच्या सुरुवातीचे बोल असून हनी सिंग याने हे गाणं गायलं आहे. तर यात सलमान खान आणि त्याचे सह अभिनेते लुंगी नेसून डान्स करताना दिसत आहेत. हनी सिंगही या गाण्यात लुंगी नेसून डान्स करत आहे. पण हे गाणं प्रदर्शित होताच या गाण्याचे बोल आणि सलमान खानचा अंदाज नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही.
आणखी वाचा : “‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट फ्लॉप झाला तर…” सलमान खानचे वक्तव्य चर्चेत
सलमान खानने या गाण्याचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर करताच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एका नेटकाऱ्याने लिहीलं, “हे गाणं ऐकल्यावर मला लहान मुलांची बडबडगीतं ऐकल्यासारखं वाटलं.” तर दुसरा म्हणाला, “या गाण्याची काय गरज होती का?” तर आणखी एक जण म्हणाला, “सलमान खानने चित्रपट करणं सोडून दिलं पाहिजे. आता हे सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे.” तर अजून एकाने लिहीलं, “सलमान भाई, या वयात काय करताय हे!” तर एकजण म्हणाला, “भाई मी तर तुझ्या या चित्रपटाची तिकीटं बूक केली होती.” त्यामुळे त्याचं हे नवं गाणं चित्रपटाला मिळू शकणाऱ्या प्रतिसादावर परिणाम करू शकतं असं काहींनी म्हंटल.
हेही वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत. साजिद नाडियादवाला याची निर्मिती केली आहे