अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी आता ओटीटी क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.’तत्लुबाज’ या वेब सीरिजमधून नर्गिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी ती खूप उत्सुक आहे, पण नर्गिसनं आता स्वतःसाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. ओटीटीवर जरी काम करणार असली तरीही कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न होणार नाही, असं स्पष्टच नर्गिसनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ओटीटीवरील पदार्पणाविषयी बोलत असताना नर्गिस म्हणाली, “मी कधीही कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न होणार नाही. कारण मला नग्नता हा विषय आवडत नाही. पण, लैंगिकतेवर भाष्य करणाऱ्या किंवा समलैंगिकता संबंधित आव्हानात्मक पात्र साकारण्यासाठी मला संकोच वाटणार नाही. अशाप्रकारची कोणतीही पात्र साकारणे हा माझ्या कामाचा भाग आहे. हे एक फक्त पात्र आहे, त्यामुळे मला याबाबत काहीही खटकत नाही.”

हेही वाचा – अभिनेते गिरीश कुलकर्णी सोशल मीडियाचा वापर का करत नाहीत? म्हणाले, “फॉलो…”

हेही वाचा – Video: टोमॅटो महागल्यानं राखीनं उचललं ‘हे’ पाऊल; म्हणाली, “आता सात जन्म…”

“ओटीटीवर खूप वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सीरिज, चित्रपट आहेत. यामुळे प्रेक्षकांनी काय पाहावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. जर एखादी सीरिज आवडली नाही, ती बंद करून दुसरी सीरिज प्रेक्षक बघू शकतात. मी ओटीटी या माध्यमाच्या ठराविक सीमारेषा ओलांडून आणखी वेगळ्या पात्रांची भूमिका निभावण्यासाठी उत्साही आहे. नेहमीचे पात्र निभावण्यात रस नाहीये. एक अभिनेत्री म्हणून पात्रतेत येणारा तोचतोपणा नकोय” असं नर्गिस म्हणाली.

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’चा असाही परिणाम! दिग्दर्शक केदार शिंदे गौप्यस्फोट करीत म्हणाले, “आता स्त्रिया मला…”

दरम्यान, नर्गिस ‘तत्लुबाज’ या वेब सीरिज व्यतिरिक्त कृष जगरलामुदी लिखित आणि दिग्दर्शित ‘हरि हर वीरा मल्लू’ चित्रपटात दिसणार आहे. हा
अॅडव्हेंचर चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नर्गिस व्यतिरिक्त निधी अग्रवाल, बॉबी देओल, पवन कल्याण हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.