बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट व रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. ६ नोव्हेंबरला त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. आलिया-रणबीरने त्यांच्या गोंडस मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेकीच्या जन्मानंतर काही दिवसांनंतरच रणबीर कामावर परतला. आता आलियाही लेकीला सांभाळत स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. आलियाने फिटनेससाठी योगा करायला सुरुवात केली आहे. नुकतंच आलियाला योगा क्लासबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन आलियाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा>> अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>> Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेकीला घरी सोडून योगा करायला आल्यामुळे काहींनी आलियाला ट्रोल केलं आहे. आलियाच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने “मुलीला घरी एकटीला सोडून योगा. काय आई होणार तू?” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “एवढ्या छोट्या बाळाला नोकराकडे सोडून आली” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण

आलिया व रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर दोन महिन्यांतच त्यांनी आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. लग्नानंतर सात महिन्यांतच आई झाल्याने आलिया ट्रोलही करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New mommy alia bhatt spotted at yoga class netizens troll her kak