बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटाची बरेच महिने चर्चा आहे. अजय देवगणचे चाहतेही खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आधी करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची दोन वर्षे वाट पाहावी लागली. निर्माते हा चित्रपट जून २०२२ मध्ये रिलीज करणार होते. मात्र तेव्हा त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला नाही. आता या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.

आणखी वाचा : अन्नू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक, केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घातला लाखो रुपयांचा गंडा

IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
RBI rate cut delay will lead to more growth sacrifice
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीस विलंब केल्यास विकासवेग मंदावेल; फेब्रुवारीमध्ये पाव टक्का कपात अपेक्षित 
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Sanju Samson is unlikely to get a chance in the Indian team for Champions Trophy 2025 reports
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून
mumbai bmc assured drug distributors 50 percent payments in two weeks rest by February 15
औषध आणीबाणी टळली, औषध वितरकांची दोन आठवड्यात देयके मंजूर होणार
nta decides to postponed ugc net exam date due to festivals
‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय

यापूर्वी ‘मैदान’ ११ डिसेंबर २०२० रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता परंतु करोनामुळे त्याची रिलीज डेट १३ ऑगस्ट २०२१ करण्यात आली. त्यानंतर काही कारणाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ती १५ ऑक्टोबर २०२१ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तेव्हाही हा चित्रपट प्रदर्शित केला गेला नाही आणि पुन्हा एकदा रिलीजची तारीख बदलली गेली. हा चित्रपट ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु त्यावेळीही या चित्रपटाची रिलीज डेट पुढे धाकलण्यात आली.

अनेकवेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता हा चित्रपट पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. १७ फेब्रुवारी २०२३ ही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख आहे. ही बातमी आल्यानंतर या चित्रपटासाठी आणखीन वाट पाहावी लागणार असल्याने अजय देवगणच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. अजय देवगणचा हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. निर्माते हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित करतील. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : “मेरा नाम विजय साळगांवकर और ये मेरा कन्फेशन…”, ‘दृश्यम 2’ चा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित

अजय देवगणच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘थँक गॉड’, ‘भोला’, ‘दृश्यम २’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या बॅक टू बॅक रिलीजमुळे ‘मैदान’च्या रिलीज डेटमध्ये सारखा बदल येत असल्याचे समोर आले आहे.

Story img Loader