दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘बाहुबली’ प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज प्रदर्शित झाला होता. व्हीएफएक्स आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाला लोकांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. हा चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती समोर आली होती. बजेटच्या मुद्द्यावरुनही चित्रपटावर टीका होऊ लागली. ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. चित्रपटातील व्हीएफएक्ससह वेशभूषा, कास्टिंग अशा गोष्टींवरुन प्रेक्षक ओम राऊत यांच्यावरही लोक निशाणा साधू लागत आहेत.

‘बाहुबली’ फ्रेन्चायझीनंतर प्रभासचे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले ‘साहो’, ‘राधेश्याम’ असे बिगबजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. ट्रेलर पाहून चाहते निराश झाले आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण सर्व बाजूंनी मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिसादामुळे निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे असे म्हटले जात आहे. या संबंधित पोस्ट दिग्दर्शक ओम राऊत यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा – आलिया की रणबीर, कोणासारखी दिसते नात? आजी नीतू कपूर म्हणाल्या…

या पोस्टमध्ये “जय श्री राम. आदिपुरुष हा केवळ चित्रपट नसून प्रभू श्री राम यांच्या प्रती असलेली भक्ती आणि आपल्या गौरवशाली इतिहास व संस्कृतीच्या प्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अद्भुत अनुभव मिळावा यासाठी आदिपुरुषशी जोडलेल्या लोकांना अधिकचा थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. १६ जून २०२३ आदिपुरुष प्रदर्शित होणार आहे. भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तुमचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या सदैव पाठिशी राहू द्या”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – Sambhajiraje on Akshay: अक्षय कुमारने शिवरायांची भूमिका साकारणं पटतं का? संभाजीराजे म्हणाले “अक्षय असो नाहीतर कोणी टॉपचा….”

या चित्रपटाच्या व्हीएफएक्स विभागामध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. यासाठी आणखी १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांचे पात्र प्रभास साकारणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंह हे कलाकार दिसणार आहे. ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये भगवान हनुमान यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Story img Loader